इतरइंदापूर

अटीतटीच्या लढतीमध्ये अखेर भरत शहा यांची नगराध्यक्ष पदावर गवसनी!

Spread the love
अखेर इंदापूर मध्ये कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे पारडे जड!
भिगवन /प्रतिनिधी
इंदापूरचे निवडणुकीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शहा आणि राष्ट्रवादीचे बंडखोरी केलेले पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्यामध्ये होणाऱ्या लढती कडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत भरत शहा यांनी प्रतिस्पर्ध्याचा कडवा सामना करत अखेर विजय खेचून आणला . या विजयामागे आमदार दत्तात्रय भरणे यांची ठोस साथ निर्णायक ठरल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे . भरणे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने इंदापुरात आपली पकड मजबूत करत एकूण १४ नगरसेवक निवडून आणले आहेत . माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि भाजपचे नेते प्रवीण माने यांना मोठा धक्का दिला आहे . विशेष म्हणजे नगराध्यक्षपदाच्या लढतीत अजित पवार गटाचे भरत शहा यांनी अवघ्या १२७ मतांच्या फरकाने विजय मिळवत राजकीय ताकद सिद्ध केली आहे .
दुसरीकडे , हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांच्या गटाला अपेक्षित यश मिळू शकले नाही . त्यांच्या समर्थक उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले . विशेषतः प्रदीप गारटकर यांचा पराभव हा या गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे . गारटकर यांना हर्षवर्धन पाटील , प्रवीण माने यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांचा पाठिंबा
होता , मात्र तो मतपेट्यांपर्यंत पोहोचू शकला नाही . परिणामी तिघांनाही पराभवाची चव चाखावी लागली . इंदापूर नगरपरिषदेत एकूण निकाल पाहता राष्ट्रवादी काँग्रेसने दमदार कामगिरी करत १४ उमेदवार विजयी केले आहेत . तर कृष्णा भीमा विकास आघाडीला पाच जागांवर समाधान मानावे लागले आहे . या निकालामुळे नगरपरिषदेत सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती भक्कम झाली आहे . नगराध्यक्षपदावरही राष्ट्रवादी काँग्रेसचेच भरत शहा विराजमान झाल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे . एकंदरीत पाहता दत्तात्रय भरणे यांची इंदापुर तालुक्यावरती पकड अधिक मजबूत झाल्याचे दिसून येत आहे. मा सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच नुकतेच भाजपमध्ये पक्ष प्रवेश केलेले प्रवीण माने यांच्या नेतृत्वावर ही प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचेही दिसून येत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वर्चस्व पुन्हा एकदा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या स्वरूपाने व नूतन नगराध्यक्ष भरत शहा यांच्या रूपाने नवीन पर्व उदयाला येत असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *