अवैधरित्या ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर भिगवण पोलीस ॲक्शन मोडवर
भिगवन / प्रतिनिधी
ऊस वाहतूककरणाऱ्या ट्रॅक्टरमुळे होणाऱ्या अपघाताविषयी भिगवण पोलीस ॲक्शन मोडवर आलेले दिसून येत आहे . कारण ट्रॅक्टर मुळे अनेकांना भिगवन बारामती रोडवर आपल्या जीव गमवावा लागला होता याच गोष्टीला अनुसरून भिगवण पोलिसांनी. कडक पवित्रा घेऊन अवैधद्यरित्या ऊस वाहतूक करणाऱ्यांवर खडक कार्यवाहीचा भडगा सुरू केला आहे,ऊस वाहतूक करणार्या वाहनांच्या सुरक्षिततेसाठी भिगवण पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात आली. ऊस वाहतूक करणार्या वाहनांची तपासणी करत 12 ते 13 ट्रॅक्टर वर कारवाई केली .
बारामती ऍग्रो तसेच इतर कारखान्यात येणार्या ट्रॅक्टर, मिनी ट्रॅक्टर आणि बैलगाडी चालकांची कसून कागदपत्रे तसेच नियमित आवश्यक असणाऱ्या बाबी तपासात वाहन चालकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
चालकांना चारित्र्यप्रमाणपत्र कार्यालयात जमा करणे, वाहनाचा विमा, परवाना, आधारकार्ड आदी कागदपत्रे सोबत ठेवणे, दारू पिऊन वाहन न चालविणे, तसेच वाहन बिघाड झाल्यास मार्गाच्या कडेला थांबवून टायरला स्टॉपर लावणे अशा महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. चालत्या वाहनांवर मोठ्या आवाजात गाणी वाजवू नयेत आणि गरज भासल्यास डायल 112 वर संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय वाहतूक सुरक्षिततेसाठी वाहनांच्या पुढील व मागील बाजूस रिफ्लेक्टर लावणे, त्यावर कारखान्याचे नाव, चालकाचा संपर्क क्रमांक आणि रक्तगट नमूद करणे असणे आवश्यक अश्या सूचना. तसेच चालकांनी रिफ्लेक्टर जॅकेटचा वापर करावा, असेही निर्देश देण्यात आले.
भिगवण ते शेटफळ कडे या रस्त्यावरती आतापर्यंत झालेल्या ट्रॅक्टर वाहतूक चालकांकडून अपघातावर शिस्त लावण्यासाठी भिगवण पोलिसांनी कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. मदनवाडी येथील घाटात बारा ते तेरा ट्रॅक्टर यांच्यावर कारवाई केलीच पण अन्य ट्रॅकर वाहतुकीवर नियंत्रण देखील करणार आहोत. त्यामुळे मदनवाडी येथून तसेच शेटफळगडे येथे पर्यंत ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांनी बेशिस्तपणे वाहन चालवता वाहतुकीचे सर्व नियम पाळत वाहन चालवणे बंधनकारक असल्याचे सांगितले. बेशिस्तपणे वाहन चालवत आढळल्यास त्याच्यावरती दंडात्मक तसेच कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
यावेळी कारवाई करताना कारवाईसाठी भिगवन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महांगडे साहेब, पीएसआय खाडे, पोलीस हवालदार, उगले, पोलीस कॉन्स्टेबल गणेश करचे, पोलीस हवालदार सूर्यवंशी, पोलीस हवलदार, साबळे, महिला पोलीस हवालदार भोंग, पोलीस कॉन्स्टेबल पवार, पोलीस कॉन्स्टेबल आप्पा भांडवलकर यांनी केली.
Your message has been sent

