ताज्या बातम्या

पोंधवडी ग्रामपंचायत वर उपसरपंच पदी सौ शारदा नवनाथ भोसले यांची बिनविरोध निवड

Spread the love
भिगवन/ प्रतिनिधी
अखेर पोंधवडी ग्रामपंचायत मध्ये डॉ तुळशीराम खारतोडे यांनी उपसरपंच पदाचा राजीनाम दिल्या नंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडीचा तिढा सुटला आहे दिनांक 10 जुलै रोजी उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया ग्रामपंचायत पोंधवडी मध्ये पार पडली यावेळी उपसरपंच पदाचा सौ शारदा नवनाथ भोसले यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने उपसरपंच पदाची माळ त्यांच्या गळ्यामध्ये पडली आहे. यावेळी पोंधवडी ग्रामपंचायत सरपंच सौ सारिका शिंदे, सदस्य नानासाहेब बंडगर, डॉ, तुळशीराम खारतोडे, अर्चना बंडगर, शारदा नवनाथ भोसले, उपस्थित होते, सूचक म्हणून डॉक्टर तुळशीराम खारतोडे यांनी नाव सुचवले यावर सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी एकमत करून त्यांच्या निवडीला प्राधान्य दिले. निवडणूक प्रक्रिया निवडणूक अध्यक्ष अधिकारी सरपंच सारिका हनुमंत शिंदे तसेच सहाय्यक निवडणूक अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी रावसाहेब गवंड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष पोंधवडी दशरथ भोसले, प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक हनुमंत शिंदे, माजी सरपंच नवनाथ बंडगर, मा ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग भोसले, प्रदीप बंडगर सह गावातील बहुसंख नागरिक यावेळी उपस्थित होते, उपसरपंच पदाच्या निवडीनंतर पॅनल प्रमुख नाना बंडगर सह डॉक्टर तुळशीराम खारतोडे यांच्याशी संपर्क साधला असता यांनी सांगितले की सर्वांना समान संधी देऊन समतोल राखण्याचा  हा छोटासा आमचा प्रयत्न आहे असे आवर्जून त्यांनी सांगितले, त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये सर्वांना एकत्रितरित्या घेऊन पुढे चालण्याची ग्वाही दिली, त्याचप्रमाणे नूतन उपसरपंच शारदा भोसले यांच्याशी वार्तालाप केला असता यांनीही आवर्जून सांगितले की एकनिष्ठ राहिलेल्यांना संधीही नक्कीच मिळते त्याचप्रमाणे दिलेल्या संधीच सोनं करणारा असून पॅनल प्रमुख सह इतर सर्व सदस्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रामाणिक काम करण्याची ग्वाही दिली,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *