इंदापूर मार्केटमध्ये डाळींब प्रति किलो रु. 275/- या उच्चांकी दराने विक्री- सभापती मा. तुषार जाधव
भिगवन / प्रतिनिधी
खऱ्या अर्थाने इंदापूर मार्केट कमिटी शेतकऱ्यांसाठी एक वरदानच ठरलेली आहे याच गोष्टीची प्रचिती पुनश्च एकदा पहावयास मिळाली
मुख्य बाजार इंदापूर येथे चालु सप्ताहात डाळींब प्रति किलो रु. 275/- या उच्चांकी दराने विक्री झाली आहे. पेरु प्रति किलो रु. 55/-, कांदा प्रति क्विंटल रु. 2200/- पर्यंत विक्री झालेली आहे. तसेच इंदापूर बाजार समितीत नविन ड्रॅगन फ्रुट आवक होऊन प्रति किलो रु. 81/- पर्यंत विक्री झालेली आहे.* इंदापूर बाजार समितीमध्ये खरेदीसाठी आंध्रप्रदेश, कलकत्ता, कर्नाटक, तेलंगणा, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, झारखंड, छत्तीसगड या राज्यातील खरेदीदार डाळींब, पेरु, ड्रॅगन फ्रुट शेतमाल उच्चांकी दरात खरेदी करीत आहेत. शेतकऱ्यांना सेवा-सुविधा देणेस ही बाजार समिती अग्रेसर आहे. इंदापूर बाजार समिती मुख्यत: भुसार, डाळींब, कांदा, मासे(मासळी), पेरु, सिताफळ, ड्रॅगन फ्रुट, फुले या शेतमालाच्या आवकेकरीता प्रसिद्ध बाजारपेठ आहे. इंदापूर बाजार समितीच्या मुख्य व उपबाजाराच्या ठिकाणी शेतमाल उघड लिलावाने विक्री, चोख वजनमाप व विक्रीनंतर शेतकऱ्यांना हिशोबपट्टी, त्वरीत रक्कम अदा केली जाते.
इंदापूर बाजार समितीचे कामकाज राज्याचे क्रिडा व अल्पसंख्याक-कॅबिनेट मंत्री नामदार . दत्तात्रय(मामा) भरणे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे संचालक तथा माजी सभापती . आप्पासाहेब जगदाळे व मोहोळ तालुक्याचे माजी आमदार . यशवंत(तात्या) माने यांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शकपणे सुरु आहे. अशी माहिती बाजार समितीचे सभापती मा. तुषार जाधव व उपसभापती मा. मनोहर ढुके यांनी दिली.
बाजार समितीने शेतकरी बांधवांच्या शेतीमालास चांगला दर मिळावा या उद्देशाने मुख्य बाजार इंदापूर अकलुज रोडलगतच्या बाजार आवारात धान्य सफाई यंत्र सुविधा(ग्रेडींग मशीन) उभारणी केलेली आहे. तसेच उपबाजार वालचंदनगर-कळंब येथे शेतकरी व संबंधित घटकांच्या मुला-मुलींच्या शुभकार्यासाठी मापक दरात उपलब्ध होणेकरीता आकर्षक, प्रशस्त, बंदिस्त व इतर अनुशंगिक सर्व सोयी-सुविधांयुक्त बळीराजा मंगल कार्यालय उभारणी केलेले आहे. इंदापूर बाजार समितीने शेतमाल तारण योजनाही सुरु केलेली आहे. बाजार समितीने मुख्य बाजार इंदापूर मार्केट 60 मे. टन, शिवलिलानगर-इंदापूर अकलुज रोडलगत 80 मे. टन, उपबाजार भिगवण, निमगांव-केतकी व वालचंदनगर चे ठिकाणी 60 मे. टन व क्षमतेचे भुईकाटा (वे-ब्रिज) असुन त्यांची 24 तास सेवा उपलब्ध आहे. *समितीचे उपबाजार भिगवण राशीन रोडलगत बाजार आवार क्षेत्रामध्ये शेतकरी बांधव व व्यापारी वर्गाकरीता नव्याने 100 मे. टन क्षमतेचे भुईकाटा (वे-ब्रिज) उभारणीचे कामकाज प्रगथीपथावर असुन लवकरच भुईकाट्याची 24 तास सेवा उपलब्ध केली जाणार आहे. तसेच समितीने मुख्य बाजार इंदापूर येथे डाळींब, पेरु व इतर फळे-भाजीपाला शेतकरी, व्यापारी/खरेदीदार वर्गाकरीता लाईट, पाणी, आवक लोडींग-अनलोडींग, पॅकिंगकरीता सेलहॉल, पार्किंगसाठी प्रशस्त मोकळी जागा, बंदिस्त वॉलकंपाऊंड, टॉयलेट व राहण्याची व्यवस्था केलेली आहे
बाजार समितीने उपलब्ध केलेल्या सर्व सोयी-सुविधा, विविध योजना व उपक्रमांचा शेतकरी बांधव व व्यापारी/खरेदीदार यांनी लाभ घ्यावा असे आवाहन इंदापूर बाजार समितीचे सभापती . तुषार जाधव, उपसभापती . मनोहर ढुके, माजी सभापती मा. आप्पासाहेब जगदाळे यांनी केलेले आहे. यावेळी संचालक माजी आमदार . यशवंत माने, . विलासराव माने, दत्तात्रय फडतरे, . मधुकर भरणे, . रोहित मोहोळकर, संग्रामसिंह निंबाळकर, . संदिप पाटील, . रुपालीताई संतोष वाबळे, . मंगलताई गणेशकुमार झगडे, . आबा देवकाते, . संतोष गायकवाड, . अनिल बागल, दशरथ पोळ, . रोनक बोरा, सुभाष दिवसे व प्र. सचिव श्री. संतोष देवकर उपस्थित होते.
