मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उल्हासनगर आयुक्त मनीषा आव्हाळे यांचा सन्मान
मुंबई/ प्रतिनिधी दत्तात्रय अवघडे
उल्हासनगर : महाराष्ट्रात राबवण्यात आलेल्या शंभर दिवसांच्या कृती
आराखड्याच्या मूल्यमापणात उल्हासनगर महानगरपालिकेने प्रथम
क्रमांक पटकावल असून मनीषा आव्हाळे ह्या सर्वोत्तम आयुक्त ठरल्या
आहेत.त्याची पोचपावती म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मनीषा आव्हाळे
यांचा सन्मान करण्यात आला.
100 दिवसांचा सुधारणा कार्यक्रम अंतर्गत विजेत्यांचा गुणगौरव
सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील
मंत्रिमंडळ सभागृहात आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात
मनीषा आव्हाळे यांचा सन्मान करण्यात आला.
विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या स्थापनेपासूनच्या इतिहासात
पहिल्यांदा विदर्भ कन्या असलेल्या आयएएस अधिकारी मनीषा
आव्हाळे यांनी आयुक्त पदाचा पदभार स्विकारला आहे.शंभर
दिवसांच्या कृती आराखड्यात कार्यालयीन मूल्यमापन करण्यासा
त्यांना 90 दिवसांचा कालावधी मिळाला होता.त्यात त्यांनी शहरा ।।
शाळा आणि 5 रस्ते आदर्श करण्याचे काम हाती घेतले
आहे..महानगरपालिकेत येणाऱ्या अभ्यागतांसाठी व्हिजिटर्स मॅनेजमेंट
सिस्टीम ऍप लावण्यात आल्याने त्यांची फोटोसह डिजिटल एन्ट्री
होणार आहे.
त्यांच्यासाठी बसण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली
आहे.नगरपरिषद असल्यापासूनच्या कागदपत्रांचे वर्गीकरण करण्यात
आल्याने लेखा विभाग,मालमत्ता कर विभाग, नगररचना विभाग
आदींच्या कार्यालयांना कॉर्पोरेट लुक मिळाला आहे. पालिकेच्या
भिंतीवर शहरातील विकास व ऐतिहासिक मंदिरे आदींचे चित्र
लावण्यात आल्याने येणारे नागरिक कौतुक करून जाऊ लागले
आहेत. मराठीतील दिशादर्शक फलक व 303 दालनांचे नंबर
लक्षवेधक दिसू लागले आहेत.सहायक संचालक नगररचना ललित
खोब्रागडे यांनी नगररचना विभागाचा तसेच कर निर्धारक व संकलक
निलम कदम यांनी मालमत्ता कर विभागाचा प्रथमदर्शनी भाग मोठ्या
बोर्डने झळकावून टाकला आहे.महानगरपालिकेच्या चौकाला स्मार्ट
लुक देण्यात आला आहे.
तसेच संकेतस्थळ तयार करण्यात आले पालिकेतील सर्व कागदोपत्री
कारभाराचे रूपांतर संगणकीकरणात झाले आहे.त्यामुळे आता यापुढे
फाईल दिसत नसल्याच्या किंबहूना गहाळ झाल्याच्या प्रकाराला
पूर्णविराम मिळाला आहे.
हा सर्व अनपेक्षित बदल झाल्याने कृती आराखड्याच्या सर्वेक्षणात
उल्हासनगर महानगरपालिकेच्या पहिल्या 6 मध्ये समावेश झाला
होता.त्यानुसार समितीने महानगरपालिकेत येऊन आढावा घेतला
होता महानगरपालिकेचा झालेला कायापालट आणि योजनांची माहिती
हा सर्व अनपेक्षित बदल झाल्याने कृती आराखड्याच्या सर्वेक्षणात
उल्हासनगर महानगरपालिकेच्या पहिल्या 6 मध्ये समावेश झाला
होता.त्यानुसार समितीने महानगरपालिकेत येऊन आढावा घेतला
होता.महानगरपालिकेचा झालेला कायापालट आणि योजनांची माहिती
प्रोजेक्टरवर बघून समिती कमालीची प्रभावित झाली होती.
त्यानंतर समितीने महाराष्ट्र शासनाला अहवाल सादर केल्यावर नेमक्या
महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच उल्हासनगर महानगरपालिका आणि
आयुक्त मनीषा आव्हाळे हे दोन्ही महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकेत
प्रथम आयुक्त आल्याची महिती आली होती.
