भिगवण पोलीसांची दमदार कामगिरी, दरोडया सारख्या गंभीर गुन्हयातील आरोपी केला एक तासाचे आतमध्ये जेरबंद
गुन्हेदाराकडून मोबाईल सह, मोटार सायकल असा एकुण ५०,००० /- रू किंमतीचा मुदद्देमाल केला हस्तगत
भिगवण/प्रतिनिधि
खऱ्या अर्थाने भिगवन पोलिसांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे , कारण भिगवन व भिगवण परिसरातील गावा गावात नक्कीच भिगवन पोलिसांच्या सतर्क ते मुळे गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे याच गोष्टीची प्रचिती भिगवन पोलिसांची आणखी एका गुन्ह्यात दिसून येते
दिनांक.०६ मे रोजी रात्रौ २१:३० वा चे पासुन ते २२:२० वा चे दरम्यान मौजे भिगवण
गावचे हददीत अथर्व कॉम्पलेक्स भिगवण ता. इंदापुर, जि.पुणे याठिकाणी फिर्यादी नामे श्री आप्पासाहेब किसन
दाताळ, वय ४० वर्षे, व्यवसाय अथर्व लॅब चालक रा. अथर्व हाईट्स अमर दिप हॉटेलच्या पाठीमागे, ता. बारामती,
जि.पुणे यांना अज्ञात पाच ते सहा अनोळखी इसमांनी पकडुन त्यांचे हात पाय बांधुन त्यांचे तोंडाला कापड
बांधुन त्यांचे पैकी एकाने फिर्यादीचे गळयाला लोखंडी सुरी लावुन फिर्यादी यांना मारहाण करून जीवे ठार
मारण्याची धमकी देवून फिर्यादीचे खिशातील जबरदस्तीने , मोटार सायकल चाव्या अॅपल कंपनीचा
आय फोन १३, ४,०००/- रोख रक्कम व घरातील सामान अस्ताव्यस्त करून कपाटीतील १५.२०० ग्रॅम
वजनाचे सोन्याचे दागिणे किंमत रुपये १,४०,०००/- रू चे अॅक्टिव्हजन कंपनीचा सी. सी. टी. व्ही. फुटेज DVR
किंमत रुपये १५,०००/- रू असा एकुण १,८४,०००/- रू किंमतीचा ऐवज जबरदस्तीने चोरून त्यांचे
दोन मोटार सायकल वरून पळुन गेले आहेत. म्हणुन अज्ञात पाच ते सहा अनोळखी चोरटे यांचेविरुध्द भिगवण पोलीस स्टेशन, गुन्हा दाखल केला आहे .
सदरची घटना ही अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्यामुळे जन सामान्य नागरीकांचे मनामध्ये भितीचे
वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखुन भिगवण पोलीस स्टेशन, प्रभारी अधिकारी श्री विनोद
महागडे सो , सहा. पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ वरीष्ठांना माहीती देवून मा. वरीष्ठांचे मार्गदर्शना प्रमाणे
फिर्यादी यांचेकडुन अज्ञात चोरटे यांचे बाबत माहीती घेवुन तपास टिम करून, स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण
यांचे टीम यांचेसह स्थानिक नागरीक यांना मदतीस घेवुन अज्ञात चोरटे यांचा शोध घेत असताना भिगवण
परीसरामध्ये एक संशईत इसम मोटार सायकलवर फिरत असताना मिळुन आला. त्यास ताब्यात घेवुन त्यास
त्यांचे नाव पत्ता विचारता त्याने त्यांचे नाव लहु नवनाथ गायकवाड, रा. कोरेगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर असे
असल्याचे सांगितले. त्याचे ताब्यात असलेल्या मोटार सायकलवर नंबर नसल्याने नंबर बाबत विचारपुस करता
तो गोंधळुन जावु लागला. त्यामुळे त्यास ताब्यात घेवून पोलीस स्टेशन येथे आणुन त्यांचेकडे अधिक विचारपुस
करता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याचे अंगझडतीमध्ये पॅन्टचे उजवे खिशात गुन्हयातील चोरीस
गेलेला अॅपल कंपनीचा आय फोन १३ मोबाई मिळुन आला. त्यांचेकडे अधिक विचारपुस करता त्यांने गुन्हा
केल्याची कबुली दिली. त्यामुळे त्यास सदर गुन्हयामध्ये दिनांक ०७ मे रोजी ०५:४० वा अटक
करण्यात आली आहे. अटक आरोपीस मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो, इंदापुर न्यायालय यांचे समक्ष हजर
केले असता मा. न्यायालयाने अटक आरोपी दि.१३/ मे रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास अमित पाटील, पोलीस उपनिरीक्षक भिगवण पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. पंकज देखमुख सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण. मा. गणेश बिरादार सो अप्पर
पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, पुणे ग्रामीण मा. डॉ सुदर्शन राठोड सो, उपविभागीय पोलीस अधीकारी, बारामती
विभाग, मा.अविनाश शिळीमकर सो. वरीष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शना
खाली विनोद महांगडे, सहा. पोलीस निरीक्षक, कुलदीप संकपाळ, सहा. पो. निरीक्षक, स्था. गु. अ. शाखा पुणे ग्रामीण,
भिगवण पो.स्टेचे अमित पाटील पोलीस उपनिरीक्षक, विजय खाडे पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार विजय
लोडी, सचिन पवार, संतोष मखरे, राजु शिंदे, सुभाष गायकवाड, नितीन सुद्रीक आप्पा भांडवलकर, यांनी केली आहे.
केलेल्या कामगिरीचे भिगवण पोलीस स्टेशन, प्रभारी अधिकारी श्री विनोद
महागडे सो , सहा. पोलीस निरीक्षक भिगवन यांच्यासह त्यांच्या संपूर्ण टीमचे भिगवन व भिगवण परिसरातील नागरीकांन कडून कौतुक होत आहे
