संपूर्ण देशामध्ये गणेश चतुर्थी बाप्पाच्या आगमनाची आतुरता असते याच पार्श्वभूमीवर यंदा 27 ऑगस्ट रोजी गणेश आगमनासाठी खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांची भिगवण या ठिकाणी गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी गर्दी पहावयास मिळाली,, गेले तीन वर्षापासून मार्केट यार्ड या ठिकाणी गणेश मूर्ती विक्रेत्यांना या ठिकाणी जागा दिल्याने आत मधील गर्दी कमी झाली व मार्केटमध्ये सुसज्ज जागा असल्याने वाहनधारकांना वाहने लावण्यास अडचण येत नसून, गणेश मूर्ती खरेदी करताना ग्राहकांच्या कुठल्याही प्रमाणात अडचण येत नसून, विक्रेत्यांनीही यामुळे समाधान व्यक्त केले आहे, खऱ्या अर्थाने कुठल्याही गोष्टीवर नियंत्रण ठेवायचं म्हटलं तर पोलीस प्रशासनाला आपली पराकाष्टा पणाला लावावी लागते याच गोष्टीला अनुसरून पोलीस प्रशासन गर्दीला सुंदर पद्धतीने नियंत्रण ठेवून लोकांना अडचण होणार नाही याची दक्षता घेत होते , पहिले गणेश मूर्ती विक्रेते रस्त्यावर असल्याने ट्राफिक ची समस्या नागरिकांना मनपसंत खरेदी न करता येणे ह्या समस्या वारंवार होत्या मात्र आता प्रशस्त जागेमुळे नागरिकांनाही उस्फूर्तपणे आपल्या बाप्पाच्या आगमना करता तयारी करण्यासाठी वेळ मिळत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे