सुधाकर बोराटे यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या इंदापूर तालुका प्रमुखपदी निवड.;
गरीब व गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत मिळवून देण्याची जबाबदारी.
भिगवन/प्रतिनिधी
गोरगरीब, गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी मदत मिळवून देण्याच्या उद्देशाने शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या इंदापूर तालुका प्रमुखपदी सुधाकर बोराटे यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक-अध्यक्ष मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुधाकर बोराटे यांची ही निवड करण्यात आली आहे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून गोरगरीब, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांमध्ये राखीव खाटांचा लाभ मिळवून देणे, निकषात बसणाऱ्या गरीब रुग्णांवर मोफत अथवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करून देण्यासाठी मदत करणे, तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करणे, अशी जबाबदारी नमूद करण्यात आली आहे. तसेच गंभीर व खर्चिक शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या गोरगरीब व गरजू रुग्णांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पक्षप्रमुख वैद्यकीय सहाय्यता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, श्री सिद्धिविनायक ट्रस्ट, टाटा ट्रस्ट आदी विविध माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.या प्रसंगी महेश लोंढे.जिल्हा समन्वयक, सतिश गावडे,पुणे जिल्हा संपर्क प्रमुख,सुनिल निंबाळकर.उपजिल्हा प्रमुख,पुष्पांजली जडे.बारामती तालुका समन्वयक,डाॅ.अनिल जडे, विद्या गायकवाड इत्यादी प्रमुख उपस्थित होते. सुधाकर बोराटे यांच्याशी निवडीबाबत वार्तालाभ केला असता यांनी आवर्जून सांगितले की येथून पुढे कामाची जबाबदारी वाढली असून या योजनेचा जास्तीत जास्त गरजू नागरिकांना लाभ मिळन देण्यासाठी सतत प्रयत्न करणार आहे , त्याचप्रमाणे माझ्यावर ठेवलेला विश्वासाला तडा न देता प्रामाणिकपणे दिलेली जबाबदारी पार पडणार असल्याचे सांगून केलेल्या निवडीबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.

