बारामती तालुका पोलीस ठाणे हद्दीतील अवैद्य दारू विक्रीच्या धंद्यावर धडक कारवाई, ग्रामस्थांकडून कारवाई च कौतुक!
बारामती :- प्रतिनिधी
बारामती पोलीस ठाणे हद्दीत कटफळ तालुका बारामती येथे अवैद्य दारू विक्री होत असल्याची गुप्त बातमीदारमार्फत मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने दिनांक 29 जून रोजी दु, सुमारास बारामती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार व त्यांच्या पोलीस स्टाफ सह पोलीस ठाणे हद्दीत कटफळ रेल्वे लाईन जवळ 1) हर्षद गणेश निकाळजे राहणार कनेरी तालुका बारामती याचे दारू विक्रीच्या ठिकाणी छापा टाकला असता त्याचे जवळ अंदाजे 2800/- रुपये किमतीच्या देशी दारूच्या 70 बाटल्या व 1520/ रोख रक्कम असा एकूण 4320/- रुपयाचा माल मिळून आल्याने त्याचे विरुद्ध बारामती तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर 311/2026 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65(E) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 2) सौ दिव्या गणेश मदने राहणार कटफळ तालुका बारामती ही MIDC आयर्न बॉयलर कंपनी जवळ अवैद्य दारू विक्री करत असलेल्या ठिकाणी छापा टाकला असता तिचे जवळ अंदाजे 2400/- रुपये किमतीच्या देशी दारूच्या 60 बाटल्या असा माल मिळून आल्याने त्याचे विरुद्ध बारामती तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर 312/2026 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65(E) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.3) मुकुंद चंदर मदने रा कटफळ तालुका बारामती हा कटफळ गावचे हद्दीत समर्थ हॉटेल जवळ अवैद्य दारू विक्री करत असलेल्या ठिकाणी छापा टाकला असता तिचे जवळ अंदाजे 960/- रुपये किमतीच्या देशी दारूच्या 24 बाटल्या असा माल मिळून आल्याने त्याचे विरुद्ध बारामती तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर 313/2026 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65(E) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण संदीप गील मा.अपर पोलीस अधीक्षक बारामती, गणेश बिरादारर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती, चैतन्य कदम, पोलीस निरीक्षक, बारामती तालुका पोलीस ठाणे नारायण पवार,यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली, ग्रेड पो उप नी/ श्री कल्याण शिंगाडे, पो हवा/ थोरवे , पो हवा/वीर , मपोहवा/प्रेमा सोनवणे, मपोहवा /राजश्री आटोळे , पोशि/निलेश वाकळे, पो शि/खटके , पो शि मनोज पवार, मपोशि/ मेघा शिंदे यांनी सदरची कामगिरी केली आहे. नक्कीच आशा केलेल्या कार्यवाहीमुळे बारामती व बारामती परिसरामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्यात कामगिरीची कौतुक होत असून येणाऱ्या काळामध्ये अशाच प्रकारचे कार्यवाही करून अवैध. धंद्यांना चाप बसणार असल्याची माहिती त्यांनी दिली,

