इंदापूरताज्या बातम्या

भिगवण पोलीसांची दमदार कामगिरी! ,

Spread the love

,
शेतकऱ्यांचा केबल चोरी करणारे अटट्ल गुन्हेगार जेरबंद;
६,३३,६५० / – रूपये किंमतीचा मुदद्माल केला हस्तगत …
भिगवन :- प्रतिनिधी
नुकतीच भिगवन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे यांनी भिगवण पोलीस स्टेशनची सूत्रे हाती घेतल्यानंतर, शेतकरी राजांवर होणाऱ्या शेती पूरक वस्तूची चोरींची प्रकार वाढल्याने यांच्यावर खऱ्या अर्थाने खूप मोठे आव्हान यांच्यासमोर उभे होते,
उजनी धरणाचे बॅक वॉटरचे पाण्यातील शेतीसाठी देण्यात येणाऱ्या पाण्याचा मोटारी व केबल चोरीस जात असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये खुप मोठया प्रमाणामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते सदर घटनेचे गांभीर्य ओळखुन भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे यांनी तात्काळ वरीष्ठांना माहीती देवुन ,वरीष्ठांचे मार्गदर्शने व आपल्या अनुभवाच्या जोरावर भिगवण पोलीस स्टेशनचे हददीत मौजे डिकसळ गावचे हददीत डिकसळ चौकीचे समोर भिगवण ते राशिन रोडवर नाकाबंदी नेमणुक वाहनांची चेकींग तत्काळ चालु केली .
दि. 27 जूनच्या रोजी रात्रौ ०३:०० वा चे सुमारास मौजे डिकसळ गावचे हददीत डिकसळ पोलीस चौकीचे समोर राशिन भिगवण रोडवर पोलीस अंमलदार अजित सरडे यांना गोपनिय बातमीदार यांचे मार्फेतीने माहीती मिळाली की , राशिन ते भिगवण रोडने राशिन बाजुकडुन भिगवण बाजुकडे एक पांढऱ्या रंगाची फोर व्हिलर गाडी येत असुन त्यामध्ये चोरीचा माल असल्याची शक्यता नाकारता येत नाही अशी माहीती मिळाल्याने पोलीस अंमलदार अजित सरडे यांनी तात्काळ प्रभारी अधिकारी सोमनाथ शेंडगे , सहा . पोलीस . निरीक्षक यांना माहीती दिली असता सदर ठिकाणी पोलीस स्टाफसह नाकाबंदी करून संशईत चार चाकी गाडी ताब्यात घेवुन त्यामधील इसम नामे १ ) निलेश राजुकमार मोटे , वय २ ९ वर्ष , रा . सत्यम अपार्टमेंट प्लॉट नंबर . ८८ सेक्टर नंबर , १ ९ खारघर , रायगड , २ ) मनोज गुलाब बिंद , वय ३७ वर्ष , रा . बरेनी बारीपूर , ता . कछवा , जि.मिंझापुर , ३ ) डब्लु बाबुलाल बिंद , वय ३१ वर्ष , रा . सदर , ४ ) विजयकुमार राशिंगार बिंद , वय २५ वर्ष , सदर , ५ ) बिसाल शिवराज बिंद , वय २० वर्ष , रा . सदर सध्या सर्व रा . गोपलपटटी शेवाळवाडी फाटा मांजरी पुणे यांना ताब्यात घेवुन विचारपुस करता ते उडवाउडविची उत्तरे देवु लागली . त्यांचे ताब्यात मिळुन आलेल्या गाडीची पाहणी करता सदरची गाडी ही हुंदाई कंपनीची फोर व्हिलर एक्सेंट गाडी नंबर . एम.एच .१२ / क्यु.डब्ल्यु . ० ९ ८५ हीमध्ये कॉपरऱ्या काळया , निळया , लाल , कसेरी , पिवळे रंगाच्या वायर ( केबल ) ९ ८१ मीटर अंदाजे किंमत १,३३,६५० / – रू ची व हुंदाई कंपनीची फोर व्हिलर एक्सेंट गाडी नंबर . एम.एच .१२ / क्यु . डब्ल्यु . ० ९ ८५ किंमत रूपये ५,००,००० / – रू ची असा एकुण ६,३३,६५० / – रू किंमतीचा मुददेमाल मिळुन आला . यातील आरोपी यांचेविरूध्द भिगवण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . वरील आरोपी यांचेकडे अधिक विचापुस करता त्यांनी इतर ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिली,
सदरची कामगिरी मा . संदीप सिंह गिल्ल साो , पोलीस अधीक्षक , पुणे ग्रामीण , मा . गणेश बिरादार साो , अपर पोलीस अधीक्षक , बारामती विभाग , पुणे ग्रामीण , मा . मधुकर भटट् साो , उपविभागीय पोलीस अधीकारी , बारामती विभाग , मा.प्रमोद क्षीरसागर साो , वरीष्ठ पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शना खाली सोमनाथ शेंडगे , सहा . पोलीस निरीक्षक , अमित पाटील पोलीस उपनिरीक्षक , पोलीस अंमलदार अजित सरडे , प्रसाद पवार , गणेश पालसांडे , सचिन पवार , समीर झांबरे , रणजीत मुळीक , महेश बोरूडे , आप्पा भांडवलकर होमगार्ड राजेश लोंढे , स्वयंम वाघ यांनी केली आहे . सदरच्या केलेल्या कामगिरीमुळे भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे यांचे ग्रामस्थानकडून विशेष कौतुक होत असून ग्रामस्थांकडून त्यांच्याबद्दल आणखी अपेक्षा वाढल्या असून मोठ्या शिताफिने गुन्ह्याचा छडा लावल्याने, नक्कीच त्यांची ओळख एक उत्कृष्ट अधिकारी असे लवकरच नवलौकिक झाले आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *