शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्राकडे अतिरिक्त निधीची मागणी; सकारात्मक प्रतिसाद!*कृषीमंत्री , दत्तात्रय भरणे
पुणे /प्रतिनिधी :-
महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकतीच केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान व् यांची नवी दिल्ली या ठिकाणी भेट घेऊन महाराष्ट्र राज्याचे कृषी धोरणाबद्दल चर्चा करून यांनी यांच्याशी वार्ताला भ करून सांगितले की महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राचा सर्वांगीण विकास, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होत असून, या योजनांमध्ये शेतकऱ्यांचा वाढता सहभागही दिसून येत आहे.
मात्र, या वाढत्या प्रतिसादामुळे काही महत्त्वाच्या योजनांसाठी मंजूर निधी अपुरा पडत असल्याने अतिरिक्त निधीची आवश्यकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्ली येथील कृषी भवन येथे केंद्रीय कृषी मंत्री मा. श्री. शिवराजसिंह चौहान यांची भेट घेऊन प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना (PM-RKVY) अंतर्गत अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
या भेटीदरम्यान राज्यातील विविध कृषी योजनांवर सविस्तर चर्चा झाली. विशेषतः कृषी यांत्रिकीकरण व सूक्ष्म सिंचन योजनांमध्ये शेतकऱ्यांचा वाढता सहभाग लक्षात घेता निधीची गरज अधोरेखित केली.
केंद्रीय कृषी मंत्री . शिवराजसिंह चौहान यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असून, येत्या काही दिवसांत आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असा विश्वास व्यक्त केला.
राज्यातील शेतकऱ्यांना अधिक बळकटी देण्यासाठी आणि कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे आवर्जून सांगितले.शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्राकडे अतिरिक्त निधीची मागणी; सकारात्मक प्रतिसाद!*कृषीमंत्री , दत्तात्रय भरणे

