दौंड पंचायत समितीच्या खडकी गणात अनुसूचित जातीचे आरक्षण; गणेश शेंडगे यांची उमेदवारी चर्चेत
राजेगाव /प्रतिनिधी
दौंड पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत.अनुसूचित जातीसाठी आरक्षण निश्चित झाले आहे. या आरक्षणामुळे इच्छुकांची संख्या बोटावर मोजण्याइतकी असली तरी, काही नवीन चेहरे निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मात्र, नेतृत्वाकडून जुन्या आणि अनुभवी जाणकार व्यक्तीला उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे, ज्यामुळे खडकी गणाची लढत चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
या बदलामुळे सध्या खडकी गणात सर्वाधिक चर्चेत असलेले नाव मलठण येथील गणेश शेंडगे आहे यांनी चेअरमन म्हणून खादी ग्राम उद्योग दौंड तालुका तसेच दौंड तालुका भाजपा पूर्व मंडल तालुका कार्यकारणी सदस्य अशी विविध पदे भूषवली आहेत त्यांचे नाते समंध मलठण, वाटलूज, नायगाव, राजेगाव, खाणवटे आणि स्वामी चिंचोली या खडकी गणाच्या हद्दीतील गावांमध्ये आहेत
खडकी राजेगाव गणातील लढतीसाठी प्रबळ दावेदार आहेत बदललेल्या राजकीय परिस्थितीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी आमदार राहुल कुल यांच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला असून, जर आमदार कुल यांनी त्यांना उमेदवारी दिली, तर आपण ही निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी बोलून दाखवले आहे.यांच्या उमेदवारीमुळे खडकी गणाची लढत केवळ जातीच्या आरक्षणाभोवती न फिरता, विकासाचे मुद्दे आणि जनसंपर्काच्या बळावर लढली जाईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
माजी सरपंच, विद्यमान सदस्य आणि विविध संस्थांमधील जुन्या जाणकार मंडळींना उमेदवारी देण्याच्या पक्षाच्या धोरणामुळे अनुभवी व्यक्तीला संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे. अनुसूचित जातीच्या उमेदवारांची संख्या कमी असली तरी शेंडगे यांचा व्यापक जनसंपर्क आणि सामाजिक कार्याचा अनुभव त्यांना इतर इच्छुकांच्या तुलनेत आघाडीवर ठेवू शकतो.

