डिकसळ पुलाला तडा केल्याने जवळपास 28 गावांचा तुटू शकतो संपर्क
भिगवन / प्रतिनिधी
इंदापूर, दौंड, बारामती, या तालुक्याला करमाळा तालुक्यातील डिकसळ पुल जोडल्यामुळे करमाळा तालुक्यातील बरेचसे गावांना दळणवळण करण्याकरता भिगवन हे नजीक ठिकाण,आहे, यामुळे नदीपलीकडी गावांना छोटे-मोठे उद्योग शेतीसाठी लागणारे बी बियाणे तसेच इंदापूर तालुक्यात सर्वात मोठे चालणारा माशाचा व्यापारही याच पुलावरून म्हणजे करमाळा तालुक्यातून बऱ्याच प्रमाणात होतो यामुळे या व्यापाराला आता फार मोठ्या प्रमाणात खिळ बसू शकते कारण ब्रिटिश कालीन बांधण्यात आलेला १८५५ काळामधील हा पूल पाण्याच्या प्रभावामुळे तडे जाऊन वाहण्यास सुरुवात झाली असून हा पूल केव्हाही कोसळू शकतो यामुळे प्रशासनाने ये जा करण्याकरता बंदी घातलेली आहे परिणामी येथील रहिवाशांना जीवन उपयोगी साधना करता जवळपास 40 ते 45 किलोमीटर वळसा घालून यावे लागणार आहे खऱ्या अर्थाने शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते कारण जवळपास दहा मिनिटांच्या कालावधीसाठी एक ते दोन तास यांना वाहनांनी प्रवेश करावा लागणार आहे या गोष्टीला नक्कीच जबाबदार कोण कारण गेले कित्येक दिवस डिसकळ पूल वाहतुकीसाठी न वापरण्याचे ब्रिटिशांनी भारतीय गव्हर्मेंटला पत्रव्यवहार केल्याने शासन आत्तापर्यंत गप्प का याची कार्य मीमांसा नक्कीच करण्यात यावी, यामध्ये सदर नवीन पुलाचे बांधकाम करण्याचे कंत्राट कंत्राटदार. तीन वर्षांमध्ये काम पूर्ण करण्याचा कालावधी दिला असून जवळपास दीड वर्ष काम बंद असून आणखी दीड वर्षात काम पूर्ण होणे शक्य नाही, असे झाले तर येथील नागरिकांना खूप मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागणार असून, यदा कदाचित एखाद्यावर आपत्कालीन समस्या आली तर दवाखान्यासाठी ही खूप मोठी फराफत करावा लागणार हे मात्र नक्की, या गोष्टीला सदर बांधकाम खाते व प्रशासन लोकांच्या जीवित असे खेळत आहे हे वास्तव कुणी ना करू शकत नाही मात्र आता तरी प्रशासनाने वेळी जागे होऊन लोकांच्या सुख सुविधा व उद्योगधंद्याचा विचार करून काळजीपूर्व लक्ष देऊन काम प्रगतीपथावर करणे गरजेचे आहे असे नागरिकाकडून बोलले जात आहे
