ताज्या बातम्या

आरक्षण उपवर्गीकरण महाराष्ट्रात लवकरच लागू करण्याचे बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आश्वासन

Spread the love

पुणे/प्रतिनिधी

सकल मातंग समाजाचे मागील तीन वर्षापासून सातत्याने आरक्षण उपवर्गीकरण करण्यासंदर्भामध्ये जवाब दो आंदोलन,दवंडी आंदोलन, मांगवीर आंदोलन असे विविध आंदोलने राज्यभरातून सुरू होते ,नुकतेच २० मे रोजी जन आक्रोश मोर्चाचे मोठे आंदोलन मुंबई येथे झाले होते या आंदोलनाला शासनाचे प्रतिनिधी म्हणून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब आले होते त्यावेळी बावनकुळे साहेबांनी येथे पंधरा दिवसांमध्ये मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक लावण्यात येईल याबाबत आश्वासन दिले होते या आश्वानाच्या पूर्तते साठी सातत्याने आमदार अमित गोरखे यांच्या पाठपुराव्यामुळे आज अ ब क ड आरक्षण उपवर्गीकरण संदर्भामध्ये सकल मातंग समाजाची सह्याद्री अतिथी गृह मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली या बैठकीला देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी राज्यात लवकरच उपवर्गीकरण लागू करण्याचे संकेत दिले.

यावेळी राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते,आमदार अमित गोरखे यांच्या पुढाकाराने बैठक आयोजित करण्यात आली होती .या बैठकीच्या प्रास्ताविक आमदार अमित गोरखे यांनी केले यावेळी बोलताना
12जून  रोजी सकल मातंग समाजाच्या शिष्टमंडळाची आपण बैठक घेत आहात त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो,
१ ऑगस्ट २०२४ रोजी सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी
आपल्या निदर्शनास आणू देऊ इच्छितो की तेलंगणा .आंध्र प्रदेश, हरियाणा आणि पंजाब या राज्यात अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे असून महाराष्ट्रातील मातंग समाज हीच अपेक्षा घेऊन या बैठकीला आलेला आहोत की आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने देखील उपवर्गीकरणाचे घोषणा लवकर करावी व श्री अनंत बदर समितीला सक्रिय करून ताबडतोब अहवाल शासनाला सादर करावा,हीच अपेक्षा आमदार श्री अमित गोरखे यांनी व्यक्त केली.
या बैठकीला मातंग समाजाचे आमदार  सुनील कांबळे, आमदार  जितेश अंतापूरकर,माजी राज्यमंत्री  दिलीप कांबळे, माजी राज्यमंत्री  रमेश बागवे, माजी आमदार  नामदेव ससाने, श्री अविनाश घाटे  रामभाऊ गुंडीले, पुणे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  सुभाष जगताप, सकल मातंग समाजाचे राज्य समन्वयक  मारुती वाडेकर  मधुकर गायकवाड,  अँड,राम चव्हाण,  बाबुराव मुखेडकर,  पंडित सूर्यवंशी,  अंकुश गोतावले.  कैलास डाखोरे,  सुरेश साळवे,  गुलाब साठे शंकर कांबळे शशिकला कांबळे केशव शेकापूरकर  मच्छिंद्र सकटे आदी मान्यवर उपस्थित होते तसेच समाजकल्याण विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते .
या प्रसंगी दिलीप कांबळे,मारुती वाडेकर,रमेश बागवे,जितेश अंतापूरकर यांनी चर्चेत सहभाग घेतला
आमदार अमित गोरखे यांनी प्रस्ताविक केले तर मुख्यमंत्र्यांचे आभार आमदार सुनील कांबळे यांनी मानले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *