ग्रामीण भागात थोठावते मोबाईल नेटवर्कची गंभीर समस्या
भिगवन /तुकाराम पवार
देशाचा जडणघडणमध्ये शेतकरी वर्गाचा सिंहाचा वाटा आहे हे वास्तव कुणीच नाकारू शकत नाही मात्र हे केवळ कागदावरच मर्यादित राहिलं आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही कारण, शेतकरी आता कुठे नेटवर्कच्या माध्यमातून आपल्या पिकवलेल्या मालाचे नेटवर्क करून योग्य भावाने आपला मालाची विक्री करू लागला आहे यातच मोबाईल कंपन्यांनी रिचार्ज बिल जवळपास दहा टक्के वाढविले असून याचे बेनिफिट मात्र रिचार्ज मारून ग्रामीण भागातील लोकांना मिळत नाही कारण नेटवर्कची होणारी सततची गंभीर समस्या , ही फार मोठी डोकेदुखी ठरली असून अति महत्त्वाच्या कामांनाही यामुळे चाप बसत आहे तक्रार निवारण कक्षाशी संपर्क साधला असता तुमच्या समस्याच कार्य मिमांसा केले जाईल असे उडवा उडवीचे उत्तरे मिळतात , या मोबाईल कंपन्यांच्या चुकीच्या धोरणामुळे ग्रामीण भागातील जनता हैराण झाली आहे , या यंत्रावर ज्या कोणी एजन्सीचा मालकी हक्क आहे त्या संबंधित यंत्रनेने या गंभीर समस्यावर लक्ष देऊन ग्रामीण भागातील आशा गंभीर समस्येवर वर लक्ष देणे गरजेचे आहे असे मत नागरिकांकडन व्यक्त होत आहे,