महसूल विभागाने शेतबांध व पानंद रस्ते केले खुले
राजेगाव /प्रतिनिधी
राजेगाव ता. दौंड येथील जाधव चोपडे वस्ती ते भिगवन रस्ता 2.5 किमीचा शेतबांध रस्ता महसूल विभागाचे मंडळ अधिकारी महेंद्र भोई यांच्या उपस्थित खुला करण्यात आला.
येथील बांधावरील शेतकऱ्यांच्या वादातून हा रस्ता अडवला गेला होता. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला व तहसीलदार अरुण शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आज शेतकऱ्यांना हा रस्ता खुला करून देण्यात आला आहे.
येथील शेतकरी बांधवांचे प्रश्न त्यांच्या अडचणी प्रत्यक्षात महसूल मंडळ अधिकारी महेंद्रसिंग भोई यांनी पाहणी करून शेतकऱ्यामध्ये मार्ग कडून बंद रस्ता खुला करून दिला.
यावेळी मधुकर जांभले अशोक भोसले ग्रामस्थ शेतकरी यांच्या उपस्थितीत येथील अडीज किमी रस्ता मोकळा करण्यात आला आहे .या रस्त्यामुळे आजूबाजूच्या पंधरा ते वीस शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा झाला आहे त्यांच्या शेतात ऊस अन्य पिके असून देखीलशेतकऱ्यांनी रस्ता मोकळा करून दिला
येथील रस्ता खुला झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.