इतरइंदापूर

गणेशोत्सवाच्या “पार्श्वभूमीवर भिगवण पोलिसांचा मॉक ड्रिल व रूट मार्च!

Spread the love

 

भिगवन /प्रतिनिधी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भिगवण पोलीस स्टेशनच्या वतीने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच आपत्कालीन परिस्थितीत प्रभावीपणे परिस्थिती हाताळता यावी, यासाठी दंगा काबू योजनेचा (मॉक ड्रिल) सराव घेण्यात आला. त्याचबरोबर भिगवण बाजारपेठ परिसरात पोलिसांच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला.

भिगवन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे यांच्या अधिपत्याखाली रूट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते,

दरम्यान, गणेशोत्सव काळात नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, सामाजिक सलोखा व सार्वजनिक शांतता कायम राहावी, या उद्देशाने दुपारी 1 ते 2.05 या कालावधीत भिगवण बाजारपेठ परिसरातून रूट मार्च काढण्यात आला.

या रूट मार्चमध्ये 5 पोलीस अधिकारी, 22 पुरुष व महिला पोलीस अंमलदार तसेच आरसीपी पथकातील 1 अधिकारी व 9 पुरुष व महिला अंमलदार सहभागी झाले होते. एकूण 6 अधिकारी व 31 पोलीस अंमलदारांनी रूट मार्चमध्ये सहभाग घेतला.

रूट मार्चदरम्यान भिगवण मुख्य बाजारपेठ, गणेशोत्सवाच्या अनुषंगाने संवेदनशील ठिकाणे, मस्जिद, मिश्रवस्ती, प्रमुख चौक तसेच गणेशोत्सवातील मिरवणूक मार्गाची पाहणी करण्यात आली.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी भिगवण पोलीस यंत्रणा सतर्क व तत्पर असल्याचा संदेश या रूट मार्चच्या माध्यमातून भिगवन  पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे यांच्या वतीने  नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *