इतरइंदापूर

नाथपंथी समनाथ महाराज संघाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य सरकाचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते संपन्न :

Spread the love
भिगवन /प्रतिनिधी 
नाथपंथी समनाथ महाराज संघाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य सरकाचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते १ऑगस्ट रोजी अंथुर्णे या ठिकाणी संपूर्ण समाज व पदाधिकारी यांच्या समवेत संपन्न झाले. यावेळी जवळपास ७ जिल्ह्यातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष माऊली महाराज शेगर, जिल्हा परिषद सदस्य मेघनाताई बंडगर, पंचायत समिती सदस्य हेमाताई माडगे, सराफ संघटना अध्यक्ष सीमाताई काळंगे, सरपंच राहुल साबळे, इंदापूर राष्ट्रवादी अध्यक्ष रंजीत पवार ,पंचायत समिती सदस्य श्रीराज भरणे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, पत्रकार संजय शिंदे, सचिन सपकाळ, सह नाथपंथी गोसावी समाजाचे विविध जिल्ह्यातील पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाप्रसंगी प्रथमता स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून सोमनाथ महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमास सुरुवात झाली याप्रसंगी, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला , या नंतर सर्व आलेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला, ना भरणे यांनी आपल्या मनोगत मध्ये  समस्त समाजाचे एकत्र येण्याचे कौतुक केले व खंबीरपणे आपल्या समाजाच्या पाठीमागे आपण उभा असल्याचे सांगितले व स्वर्गीय गणपतराव पाटील यांच्या माध्यमातून आपल्या समाजाला जागा उपलब्ध करून दिल्या तेही स्मरणात आणून दिले, त्याचप्रमाणे सदर समाज हा प्रामाणिक कष्ट करणारा व शब्दाचा पक्का असल्याचेही सांगितले, यानंतर अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले, संतोष चव्हाण यांनी समाज एकोपा टिकवण्यासाठी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे सांगितले व समाजाच्या प्रती असलेली तळमळ बोलून दाखवली, समाज एकत्रित येऊन शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी लढा देऊ हेही आवर्जून सांगितले,
सदर समाजाला स्वतंत्र महामंडळाची मागणी 
 संजय जगताप यांनी समाजाचे व्यथा मांडताना शासन दरबारी ही विनंती केली की सदर समाजाला स्वतंत्र महामंडळ झाले पाहिजे,कारण, समाजाला कुठल्याच प्रकारे ठोस ओळख नसल्याने, ठोस पुरवा नसल्याने शासनाचा कुठलाच प्रकारचााा लाभ घेता येत नाही परिणामी तो दुसऱ्या वर्गातील लोकांना जातो परिणामी समाज पुनश पाठीमागे जातोय,  या कारणास्तव स्वतंत्र महामंडळ असणे गरजेचे असल्याचे सांगितले त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्ता मामा भरणे यांच्या समोर समाजाची व्यथा मांडायची होती तेच निघून गेले तर व्यथा कोणाकडे मांडणार याचीही खंत त्यांनी दाखवून दिली, पुष्पा शेगर यांनीही महिलांप्रती असलेल्या समस्यांचा पाढा वाचला, त्याचप्रमाणे समाजाचे नेते जामखेड नगरपालिकेचे नगरसेवक ॲड अरुण जाधव यांनी भाषणाद्वारे  समाजामध्ये परिवर्तन घडवण्याच्या उद्देशाने अनमोल असे मार्गदर्शन केले, त्यांनी आवर्जून सांगितले की समाजामध्ये  विभिन्नता असल्याकारणाने, सुधारणा नसल्याचे सांगून, आपण समाजासाठी गेली 35 वर्ष काम करत असून ,साडेपाच हजार किलोमीटर समाजाची प्रगती करण्याचा पल्ला गाठला आहे, एकत्र येण्याचा त्यांनी उद्देश हाच सांगितला की  समाजांना सुधारायचे असेल तर एकीचे बळ हे सर्वश्रेष्ठ बळ असते, म्हणून या संस्थेच्या संघटनेच्या माध्यमातून आपण आपले प्रश्न शासन दरबारी मांडू, त्याचप्रमाणे संस्थापक अध्यक्ष माऊली महाराज शेगर यांचे कौतुक करून, आपले प्रश्न मामांच्या दरबारी मांडण्याचे सांगून समाजाच्या हितासाठी समाजाच्या अडीअडचणीसाठी मी वकील म्हणून सतत आपल्या पाठीमागे राहीन. याची, ग्वाही दिली व समाज सुधारायचा असेल तर कष्ट करा मुलांना मुख्य शिक्षणाच्या प्रवाहात आणा मुलांना शिक्षण द्या असा अनमोल सल्ला देऊन त्यांनी हम सब एक है नारा देऊन उपस्थित समाज बांधवांना एकजुटीचा संदेश दिला, यानंतर त्यांनी नियुक्तींचे पत्र बहाल केले,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश धापटे यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थापक अध्यक्ष माऊली महाराज शेगर यांनी मानले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *