इंदापूर

पुकारण्यात आलेल्या भिगवन,’ बंद , च्या हाकेला भिवणकरांची उस्फुर्त प्रतिसाथ;

Spread the love

भिगवण/प्रतिनिधी

मदनवाडी येथे व्यंकटेश लॉन्स मध्ये शनिवारी ( दि . १ ) रोजी महसूल विभागातर्फे आयोजित. मुख्यमंत्र्यांच्या जन्मदिनी आणि स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या जयंती महोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिराचं आयोजन मोठ्या संख्येने आयोजित केलं होतं , वास्तविक पाहता ज्यांनी राज्यघटना देशाची कशी चालवायची ते भारताला,; दिलं ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, यांचा त्यांना एवढा द्वेष का, असं सर्वसामान्य जनतेला पडलेलं फार मोठं कोढ आहे, इतर महापुरुषांबरोबर डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला स्थान देण्यात आले नाही . त्यामुळे संतप्त झालेल्या आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांकडून देण्यात आलेल्या ‘ भिगवण शहर बंद’च्या हाकेला सोमवारी बाजारपेठेतील व्यवहार बंद ठेवून पाठिंबा देण्यात आला . कार्यकर्त्यांकडून सकाळी १० वाजता उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे .
येथील डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौकात कार्यकर्ते
भीमसैनिक , राजकीय पदाधिकारी एकत्र येत महसूल प्रशासनाचा निषेध व्यक्त केला . वास्तविक पाहता संबंधित आयोजकांना अश्या प्रकारे विसर कसा काय पडू शकतो, याची कार्य मीमांसा करणे गरजेचे आहे,
यावेळी विक्रम शेलार , बाळासो शेलार , राजू गाडे , संजय देहाडे , राजेंद्र जमदाडे , अनिकेत भिसे , रोहित शेलार , देवानंद शेलार ,कृष्णा भिसे, , अमोल कांबळे  रोहित निकाळजे , प्रेम लोंढे , अभिषेक लोंढे , संदीप वाघमारे , किरण कांबळे यांनी उपोषण आंदोलनाला सुरुवात केली आहे . उपोषणाला भिगवन व भिगवण परिसरातील आस पासतील गावातील नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
अमर बौद्ध युवक संघटनेने ‘ भिगवण बंद’ची हाक दिली होती . त्यानुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती . येथील मासळी मार्केटमधील लिलावदेखील बंद होते . या उपोषण दरम्यान विविध वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले संबंधित जो कोणी अधिकारी वर्गाने जाणीवपूर्व प्रतिमा लावली नसेल या मोठ्या प्रकारामुळे अशा अधिकाऱ्याचं निलंबन व्हायला पाहिजे असे मत व्यक्त केले, आंदोलनस्थळी भिगवण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे यांनी भेट देऊन आंदोलकांचे मत जाणून घेतले . कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव, अमोल बौद्ध युवक संघटनेचे पदाधिकारी यांनी उपोषणाला तात्पुरती स्थगिती दिली, व पुकारण्यात आलेल्या बंद मध्ये व्यापारी वर्गाचे ही त्यांनी आभार मानले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *