जिल्हा परिषद शाळा’ पोंधवडीतील, विद्यार्थ्यांनी अनुभवले “वारीचे” महत्व!
भिगवण/- प्रतिनिधी
महाराष्ट्रात सर्वांत मोठा उत्सव गणला जातो तो म्हणजे,’संतश्रेष्ठ श्री जगतगुरू, तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ श्री माऊली ज्ञानेश्वर यांचा पालखी सोहळा गेली १९४ वर्षे श्री क्षेत्र आळंदी व देहू येथून पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे, खऱ्या अर्थाने पंढरपूरचे वारीचे खूप मोठे वैशिष्ट्य आहे, कारण एवढा मोठा सोहळा लाखोच्या संख्येने वारकरी संप्रदाय, कुठल्याच प्रकारे वारीला गालबोट नाही, याच गोष्टीचा जागतिक आश्चर्य म्हणावं लागेल, या संस्कृतीची दुसऱ्या देशातील लोकांनी दखल घेऊन यांनी सुद्धा वारि मध्ये सहभाग दर्शवला आहे,’साधू संत येती घरा तोच दिवाळी आणि दसरा’या उक्तीप्रमाणे प्रत्येक माणूस वारेतील लोकांना अतिथी देवो भव, या भावनेतून मनोभावे यांची काळजी घेत असतो,
याच पार्श्वभूमीवर मुलांमध्ये या संस्काराचे बीज उबरावे, या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोंधवडी येथील शिक्षकांनी , पालखी सोहळा दिंडीचे शाळेमध्ये 20 जुलै रोजी आयोजन केले होते, यावेळी मुलांना विठ्ठल रुक्मिणी त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायातील वस्त्र परिधान करून लेझीम पथका सहित वाजत गाजत पूर्ण गावामध्ये, प्रथम दर्शी दिंडी सोहळा पहावयास मिळाला, खऱ्या अर्थाने मुलांनाही वारीचे महत्त्व कळावे व मुलांनीही या गोष्टीचे अनुकरण करून चालू असलेल्या परंपराचा वसा पुढे घेऊन जावे हा या मागचा उद्देश असे शिक्षकांनी सांगितले, यावेळी प्रथमता पालखीचे पूजन समस्त गावकरी बांधव यांच्या समवेत पार पडले व पूर्ण गावाला प्रभात फेरी मारून श्री हनुमान मंदिरांमध्ये पालखी सोहळा विसावला व चिमुकल्यांनी भजन गवळण व मुलींनी फुगडी घेऊन वारकरी संप्रदायातील हा सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुनील अवघडे किशोर खाडे जाधव मॅडम यांनी केले होते. यावेळी पोंधवडीतील समस्त ग्रामस्थ सहित महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

