पुणेबारामती

बारामती तालुका पोलिस ठाणे हद्दीत रुई पाटीजवळ अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमास केले जेरबंद*

Spread the love

बारामती:- प्रतिनिधी 

दि  9.    जुलै  रोजी रात्रौ 22.15 वाचे सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना रुई पाटील जवळ एक इसम संशयितरित्या मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव ओम उर्फ लाला राजेंद्र कुदांडे मूळ राहणार भानगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर सध्या राहणार गुणवरे वस्ती स्वामी चिंचोली तालुका दौंड जिल्हा पुणे असे सांगितले तेव्हा सदर इस्माची पोलिसांनी अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात एक गावठी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काढतोस मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले. असून ओम उर्फ लाला राजेंद्र कुदंडे यांचे विरुद्ध बारामती तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 320/2026 भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3,25 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर आरोपीतास अटक केली आहे
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण श्री संदीप गिल, मा.अपर पोलीस अधीक्षक बारामती, श्री गणेश बिरादार, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती, श्री चैतन्य कदम, पोलीस निरीक्षक, बारामती तालुका पोलीस ठाणे श्री नारायण पवार यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली सपोनी विक्रम पवार,पो उप नी/ श्री कारंडे , सफौ/ शिवाजी निकम, पोहवा स्वप्निल अहिवळे, गुलाब पाटील, रहीस मुलानी सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांनी सदरची कामगिरी केली आहे.

खऱ्या अर्थाने अशा प्रकारे पोलीस प्रशासनाकडून पेट्रोलिंग झाली तर सर्वसामान्य नागरिक अगदी रात्री अपरात्री मनसोक्त वावरू शकतात याची प्रचिती बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष पणाची आली असल्याने बारामती तालुका पोलीस स्टेशनचे विशेष कौतुक होत आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *