भिगवन, शेटफळगडे, गटामध्ये अपक्ष उमेदवार “सोनाली स्वप्निल बंडगर” यांचं राहणार प्रस्थापितांसमोर कडवं आव्हान!
भिगवन /प्रतिनिधी
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे अर्ज माघार घेण्याच्या अंतिम तारखेनंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या ते किती अर्जदार निवडणुकीतून अर्ज माघार घेणार मात्र, बहु चर्चा होते ती उमेदवार “सोनाली स्वप्निल बंडगर” यांच्या नावाची, कारण गेल्या वर्षभरात तो उमेदवारांचे पती ‘स्वप्नील बंडगर’ यांनी केलेल्या विविध कामाची प्रचिती त्याचप्रमाणे सर्वसामान्य लोकांमध्ये मिळून मिसळून काम करण्याची एक नवी उमेद असणारा उमेदवार म्हणून गावागावातून मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादाला तडा न जाऊ देता अखेर स्वप्निल बंडगर यांनी आपल्या पत्नीचा “सोनाली बंडगर” यांचा उमेदवारी अर्ज जिल्हा परिषदेसाठी ,अपक्ष ठेवून निवडणुकीचे कडवे आव्हान प्रतिस्पर्धी उमेदवाराला दिलं आहे , अशी चर्चा गावागावातून च होत आहे,” कप बशी” या चिन्हावरती निवडणुकीला अपक्ष उमेदवार “सोनाली स्वप्निल बंडगर “हे सामोरे जाणार आहेत, एकंदरीत पाहता निवडणूक दुरंगी होणार असे बोलले जात असताना अपक्ष उमेदवार “सोनाली स्वप्निल बंडगर” यांच्या रूपाने जनतेला तिसरा पर्याय निर्माण झाल्याने आणि राजकारण पाहता तालुक्यामध्ये प्रतिस्पर्धी विरोधक एकत्र आल्याने, लोकांचा राजकारण्यान वरचा उडालेला विश्वास, या दृष्टिकोनातून तिसरा पर्याय हा लोकांसाठी एक कुतुहलतेचा विषय बनलेला आहे, आणि त्यातच तालुका तालुक्यातून गावागावातून लोकांनी उघडपणे केलेल्या प्रस्थापित नेत्यांवर टिकेंमुळे , मतदान विरोधात जाणार हे वास्तव कुणी नाकारू शकत नाही, याच सर्व एकंदरीत गोष्टी पाहता भिगवन, शेटफळगडे, मतदार संघात अपक्ष उमेदवार “सोनाली स्वप्निल बंडगर “यांचं नक्कीच कडव आव्हान प्रतिस्पर्धी उमेदवारांना राहणार असे गावागावातून बोलले जात आहे,,

