भिगवन पत्रकार संघाची कार्यकारणी जाहीर;
भिगवन / प्रतिनिधी
भिगवन पत्रकार संघाची कार्यकारिणी पत्रकार दिनाचे औचित साधून ६ जानेवारी २०२६ मंगळवार रोजी जाहीर करण्यात आली, भिगवन पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली व ज्येष्ठ पत्रकार, भरत मल्लाव, डॉ काशिनाथ सोलंकर विक्रम शेलार, अमोल कांबळे, नितीन चितळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवन पत्रकार संघ विविध उपक्रमाद्वारे आपल्या कामाची नेहमी चांगली प्रचिती देत असते, त्याचप्रमाणे समाज उपयोगी कार्यक्रम नेहमी राबवण्यात अग्रेसर असते, याच गोष्टीला अनुसरून यांनी
सुरू असलेल्या चांगल्या कामाचा वसा पुढे चांगल्या प्रकारे वाढवण्याकरता तरुणांच्या हाती दिला आहे भिगवन पत्रकार संघाचे अध्यक्ष, म्हणून विजय गायकवाड , कार्याध्यक्ष ,अमोल कांबळे, उपाध्यक्ष , महादेव बंडगर व तुषार हगारे , सचिव, तुकाराम पवार सहसचिव, निलेश गायकवाड, खजिनदार, प्रवीण वाघमोडे, यांची सर्वानुमते निवड करण्यात आली, यावेळी कार्यकारी सदस्यांना श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला, यावेळी सर्व कार्यकारी सदस्यांनी दिलेली जबाबदारी उत्तमरीत्या पाळण्याचे आश्वासन देऊन उपस्थित मान्यवरांना दिलेल्या जबाबदारीचं सोनं केले जाईल अशी शाश्वती दिली, यावेळी पत्रकार, भरत मल्लाव डॉ, काशिनाथ सोलंकर , नितिन चितळकर, अमोल कांबळे, विजय गायकवाड, तुकाराम पवार, तुषार हगारे, निलेश गायकवाड, राजेंद्र दीवार, अभिजीत यमगर , फिरोज खान, संजय शिंदे , अरुण भोई, रोहित भरणे, प्रविण वाघमोडे, गोरख पोंदकुले , महादेव बंडगर, हे पत्रकार उपस्थित होते, उपस्थित सर्व पत्रकारांचा सन्मान यावेळी भिगवण पंचक्रोशीतील नागरिक तसेच भिगवन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन करण्यात आला, कार्यक्रमाचे आयोजन बुद्ध विहार भिगवन या ठिकाणी भिगवन पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले होते, यावेळी सर्व पत्रकारांना ज्येष्ठ पत्रकारांनी मार्गदर्शन करून दिलेल्या जबाबदारीचे व कामाची माहिती विस्तृत प्रमाणे दिली,
यावेळी नूतन अध्यक्ष विजय गायकवाड दिलेली कामगिरी योग्य पार पाडण्याची ग्वाही दिली व मार्गदर्शक म्हणून पाठीशी खंबीर पने उभे राहिला तर अशक्य गोष्टी शक्य करून दाखवण्याची ही मत व्यक्त केले,


