संपादकीय

निपुण महाराष्ट्र’चा ऑनलाइन विळखा शिक्षक त्रस्त ,

Spread the love

 

संपादकीय.,,,,,,

राज्य शासनाच्या ‘ निपुण महाराष्ट्र ‘ अभियानाने प्राथमिक शिक्षणाचा कणा असलेल्या शिक्षकांना ऑनलाइन माहितीच्या जाळ्यात अडकवले आहे . इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी लादण्यात आलेल्या मासिक चाचण्या आणि त्यांच्या ऑनलाइन नोंदींमुळे शिक्षकांचा अध्यापनाचा वेळ मोबाइल स्क्रीनवरच खर्च होत आहे . परिणामी , विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून प्राथमिक शिक्षण व्यवस्था सध्या ‘ ऑनलाइन ओझ्याखाली हवालदिल झाली आहे .
शिक्षण विभागाने डिसेंबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत दरमहा अध्ययनस्तर मूल्यमापन बंधनकारक केले आहे . यासाठी ‘ निपुण महाराष्ट्र ( SCERTM ) ॲप ‘ विकसित करण्यात आले आहे . मात्र , एका विद्यार्थ्याची चाचणी घेण्यासाठी किमान ३० मिनिटे लागतात . ३० मुलांच्या वर्गाचा विचार केल्यास शिक्षकाचे किमान तीन दिवस केवळ परीक्षेतच जात आहेत .
अशा चार चाचण्यांच्या चक्रात शिक्षकांनी प्रत्यक्ष शिकवायचे कधी , असा सवाल शिक्षण वर्तुळातून विचारला जात आहे . ग्रामीण भागात
इंटरनेट कनेक्टिव्हिटीची मोठी समस्या आहे . त्यातच शालार्थ २.० पोर्टलवर माहिती अद्ययावत करणे , डीडीओ मान्यता मिळवणे आणि त्यानंतर लॉगिन करणे ही प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आहे . यू – डायस , शालार्थ आणि निपुण अॅप यांमधील माहितीचा ताळमेळ बसवताना मुख्याध्यापकांची मोठी कसरत होत असून शिक्षक मानसिक तणावाखाली वावरत आहेत .
शंभरहून अधिक योजनांची माहिती भरण्याचे आदेश व्हॉट्स अॅपवरून सातत्याने धडकत आहेत . तातडीची माहिती न दिल्यास वरिष्ठांकडून मिळणाऱ्या नोटिसांमुळे शाळांमध्ये भीतीचे वातावरण आहे . शिक्षकांना केवळ अध्यापनासाठी मोकळीक द्यावी , असे विविध शिक्षक संघटनांनीही म्हटले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *