इतरमुंबई

ज्येष्ठ शिक्षक कल्याण वाल्हेकर होणार राज्यस्तरीय गंगाई बाबाजी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित!

Spread the love
मुंबई /प्रतिनिधी: दत्तात्रेय अवघडे
आष्टी तालुक्यातील हाजीपुर सारख्या ग्रामीण भागातून हलाकीच्या परिस्थितीवर मात करत शिक्षण घेऊन १ ९९ ४ साली शिक्षक म्हणून कार्य सुरू केले . शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातील ही मुले घडली पाहिजेत . चांगले संस्कार देखील देऊन हजारो विद्यार्थी घडविण्यासाठी मागिल ३२ वर्षापासून ज्ञानार्जनाचे पवित्र कार्य करणारे आदर्श शिक्षक कल्याण वाल्हेकर सर यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यबद्दल अनेक पुरस्कार प्राप्त आहेत . त्यांच्या कार्याची दखल घेत शिक्षण महर्षी मा . आ . भीमराव धोंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या राज्यस्तरीय गंगाई बाबाजी आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे .
आष्टी तालुक्यातील हाजीपुर येथील
अतिशय सामान्य कुटुंबातून शिक्षण घेऊन आपल्या ज्ञानार्जनाच्या कार्यातून मागील ३२ वर्षांमध्ये अनेक विद्यार्थी घडवले डॉक्टर , वकील , इंजिनियर , राजकीय ,
सामाजिक , शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे हजारो विद्यार्थी नावलौकिक असून त्यांच्या दिलेल्या ज्ञानार्जनामुळे तरुण | पिढी घडली आहे . अनेकांचे आयुष्य | घडवणारे आदर्श शिक्षक तालुक्यात आप्पा या नावाने परिचित आहेत . मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांच्याकडे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर आकर्षित | होत असून अभ्यासाची ही त्यांना गोडी
लागत आहे . त्यांनी केलेल्या कार्यामुळे अनेक पुरस्काराने ते सन्मानित झाले आहेत . शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी संचलित पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय आष्टी येथे गेली १६ वर्षापासून शिक्षक म्हणून न्यायदानाचे
पवित्र कार्य करीत आहेत . मागिल ३२ वर्षांमध्ये हजारो विद्यार्थी घडविले आहेत . त्यांच्या या कार्याची दखल घेत राज्यस्तरीय पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे . त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ज्येष्ठ शिक्षक कल्याण वाल्हेकर यांचे शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार भिमरावजी धोंडे , युवा नेते अजय दादा धोंडे , अभय राजे धोंडे , प्रशासन अधिकारी डॉ . डी बी राऊत , डॉ . शिवदास विधाते , माऊली बोडखे , संजय शेंडे , संदीप नन्नवरे , सागर वाघुले , पंडित शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुरेश बोडखे , माजी सरपंच विठ्ठल राख , हाजीपुर समस्त ग्रामस्थ राजकीय , सामाजिक , शैक्षणिक , पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर व पंडित शाळेचे सर्व सहकारी शिक्षक शिक्षिका शाळेचे विद्यार्थी यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या .
महा 24 तास या दैनिक न्युज पोर्टल चे वरीष्ठ संपादक श्री तुकाराम पवार आणि परिवार तर्फे व दत्तात्रय प्रल्हाद अवघडे( प्रतिनिधी-महा24 तास) कुटुंबा तर्फे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *