ताज्या बातम्या

पोलीस पत्नी एकता मंचचे एक दिवसीय धरणे आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे संपन्न

Spread the love
मुंबई/ प्रतिनिधी
हा महाराष्ट्र सुरक्षित असावा याकरिता 12 महिने 24 तास कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी जनमानसात त्यांच्या दरारा असला तरी तेही आपल्या प्रमाणेच माणसं आहेत
त्यांनाही घर परिवार आहे मुलं बाळ आहेत त्यांचे शिक्षण आहे आरोग्याच्या प्रश्न निवासचा विषय आहे अशा आपल्या विविध समस्येकडे दुर्लक्ष करून नेहमी कर्तव्याला प्राधान्य देणार म्हणजे आमचे महाराष्ट्र पोलीस ज्यांना कधी आपली समस्या कोणाला सांगता येते ना कुणा सरकारकडे ती मांडता येत ना कोणती संघटना बनवता येत ना त्या संघटनेच्या माध्यमातून कोणता लढा लढता येत परंतु राज्यभर जेही काही मोर्चे आंदोलने होत असतात त्या मोर्चा आंदोलनकर्त्यांमध्ये आणि प्रशासनामध्ये समन्वयक घडून आणून त्या लोकांच्या समस्या सुटाव्यात याकरिता हेच पोलीस मध्यस्थी करत असतात जे लोकांच्या समस्यासाठी मध्यस्थी करतात त्यांच्या परिवाराच्या समस्यांचे काय हा प्रश्न कधी कोणाला पडला ना कोणी या प्रश्नासाठी लढला
पोलीस पत्नीने पुढाकार घेऊन आपल्या समस्या सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन चालू असताना
पोलीस पत्नी एकता मंचाच्या माध्यमातून आपल्या प्रमुख मागण्या घेऊन
मुंबई शहरातील पोलीस वसाहतीतील वास्तव्यास असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना मुंबईत शासकीय सवलतीच्या दरात कायमस्वरूपी हक्काचे घरे देण्यात यावीत आणि
शासकीय निवासस्थानात वास्तव्यास असलेल्या निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या दंडणीय अनुज्ञाप्ती शुल्कात सरकारकडून लक्षणीय वाढ करण्यात आली आहे त्यामुळे त्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्या असून सरकारने याची तातडीने दखल घेऊन पूर्वीचे दर लागू करण्यात यावेत
आदी मागण्या घेऊन एक दिवसीय धरणे आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे करण्यात आले यावेळी राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी पोलीस पत्नी एकता मंचाच्या पदाधिकारी जान्हवी भगत ,शैला गायकवाड,रूपाली कदम, विद्या किंजळकर,पूजा गावकर, यांची आजाद मैदान येथे आंदोलन स्थळी भेट घेऊन त्यांचे निवेदन स्वीकारले व या समस्या कडे सरकार गांभीर्याने लक्ष देईल असे आश्वासन दिले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *