अखेर महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ-सोलापूर( सलग्न)- भारतीय मजदुर संघाचे उपोषण लेखी आश्वासनंतर पाठीमागे
प्रतिनिधी:- दत्तात्रय अवघडे
महाराष्ट्र सुरक्षा
रक्षक महासंघ-सोलापूर( सलग्न)- भारतीय मजदुर संघ आयोजित दि 24 जून रोजी उपोषण हे अप्पर कामगार आयुक्त कार्यालय पुणे येथे भारतीय मजदूर संघाचे प्रदेश पदाधिकारी बाळासाहेब भुजबळ व अर्जुन चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये अप्पर कामगार आयुक्त वाघ व सोलापूर मंडळाचे अध्यक्ष सुधीर गायकवाड यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान अधिकाऱ्याकडून लेखी स्वरूपात आश्वासन दिले . तसेच, मंडळाकडून सुरक्षारक्षकांच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या, यापेक्षाही उग्र आंदोलन करण्याचे असे संघटनेकडून सांगण्यात आले. या इशारानुसार संघटना आपल्या भूमिकेवर ठाम असून केवळ लेखी आश्वासनावर विश्वास ठेवून तात्पुरत्या स्वरूपात उपोषण स्थगित करण्यात आले आहे.
याप्रसंगी भारतीय मजदूर संघ प्रदेश पदाधिकारी भुजबळ व अर्जुन चव्हाण तसेच सुरक्षा रक्षक महामंत्री विशाल मोहिते , पुणे जिल्हाचे पदाधिकारी तसेच सोलापूर जिल्ह्याचे पदाधिकारी व सुरक्षा रक्षक बांधव उपस्थित होते.
सदरचे उपोषण , जवळ जवळ जवळ 3 तास चर्चा झाली. संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार भोसले यांनी अत्यंत कुशलतेने सर्व मुद्दे चर्चा करून यापुढेही सर्व सुरक्षा रक्षक बांधवांनी एकजूटतेने संघटनेसोबत राहून सुरक्षा रक्षकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे आव्हान या वेळी करण्यात आले. तसेच सुरक्षा रक्षक बांधवांसाठी त्यांच्या हक्कांसाठी कायम कटिबध्द असु ग्वाही दिली
