ताज्या बातम्या

श्रीराम मंदिर चिंचोली येथे वृक्षारोपण व शिष्यवृत्ती वाटप

Spread the love
भिगवण / प्रतिनिधी 
श्री रामचंद्र देवस्थान स्वामी चिंचोली कार्यकारी समिती यांच्या वतीने श्री शिरीष चिंतामण इनामदार यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त मंदिर परिसरात वृक्षारोपण व शिष्यवृत्ती वाटप करण्यात आले.
श्री दत्तकला शिक्षण संस्थेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विविध विषयांतर्गत उत्तम यश संपादन केल्याबद्दल शिष्यवृत्ती देऊन सत्कार करण्यात आला.
स्वामी चिंचोली येथे पुरातन राम मंदिर असून या मंदिराचा इतिहास व मंदिर जीर्णोद्धाराची आवश्यकता या विषयावर इनामदार परिवाराने विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी मंदिरात चोवीस तास नामजप करणाऱ्या साधकांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता परमपूज्य समर्थ भक्त श्री मोहनबुवा रामदासी यांच्या श्रीराम भक्ती आणि जीवनाचा उद्धार या विषयावरील प्रवचनाने झाली
महिन्याच्या प्रत्येक एकादशीला राम पवमान अभिषेक, हनुमान रुद्र आणि होम हा उपक्रम देखील करण्यात येतो.अभिषेकाची संपूर्ण तयारी मंदिराकडुन करण्यात येते.भाविक आधीच नाव नोंदणी करुन स्वहस्ते हे कार्य करू शकतात. या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन देवस्थान कार्यकारी समिती सदस्या शीतल इमानदार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *