पावसामुळे उल्हासनगर मध्ये पाणीच पाणी!
पावसामुळे नाल्यावर पूल कोसळला
मुंबई /प्रतिनिधी :- दत्तात्रय अवघडे
वास्तविक पाहता भर पावसाळ्यामध्ये मुंबईची रस्त्याची असो वा गटर नाल्याची असो समस्या फार प्रचंड प्रमाणात सतत जर पावसाळ्यामध्ये होत असते या वरती कायमस्वरूपी उपयोजना करणे महापालिकेला आजवर तरी शक्य झालेले नसून याच गोष्टीची प्रचिती पुन्हा एकदा पहावयास मिळाली उल्हासनगर 14 जून रोजी सायंकाळी आलेल्या पावसाने शहराला झोडापले पूल कोसळला. असून कॅम्प नं-५ तानाजीनगर येथील नाल्यावरील तसेच अनेक रस्ते पाण्याखाली येऊन, व्हीटीसी मैदान व कॅम्प नं- ३ येथे प्राचीन झाड कोसळले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती महापालिका अग्निशमन दलाचे प्रमुख सुरेश बोंबे
यांनी माहिती दिली. उल्हासनगरात सायंकाळी जोरदार पाऊस सुरु झाल्याने, रस्ते निर्मनुष्य झाले. पावसाने नाले तुंबून पाणी रस्त्यावर आल्याने, अनेक रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याचे चित्र शहरांत होते. खोदलेले रस्ते पाण्याखाली गेल्याने, अपघाताची शक्यता व्यक्त
होत आहे. कॅम्प नं-५, तानाजीनगर येथील नाल्यावरील पूल
कोसळला असून परिसराचा संपर्क तुटला. तर व्हिटीसी मैदान व कॅम्प नं-३ परिसरात जूने झाड कोसळल्याने, रस्त्याची वाहतूक थांबली. आयटीआय कॉलेज, कॅम्प नं – ५ शांतीप्रकाश आश्रम रस्ता, अंबरनाथ ते कल्याण रस्ता, डॉल्फिन क्लब रस्ता, गुलशननगर रस्ता, गोलमैदान रस्ता आदी रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले.नागरिकांना व वाहनांना पाण्यातून मार्ग काढत जावे लागत होते. एकंदरीत पाहायला गेलं तर किती दिवस आणि नागरिकांना या गंभीर समस्या ना तोंड द्यावे लागणार नुसतं आश्वासन देऊन प्रश्न सुटत नसून प्रत्यक्षात कृती करून या गोष्टीचं कायमस्वरूपी बंदोबस्त करणे गरजेच आहे असं नागरिककडन बोलले जात आहे
