दिवा आणि मुंब्रा रेल्वे च्या हद्दीत लोकलमधून भीषणअपघात
प्रतिनिधी :- दत्तात्रय अवघडे
नऊ जून रोजी सकाळी 9:30 वाजता मुंब्रा आणि दिवा दरम्यान रेल्वेमार्गावर एक मोठा अपघात झाला. लोकलमधून आठ प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडले.. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर
येत आहे. तर या अपघातानंतर आता मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील लोकल ट्रेनला आता बंद होणार दरवाजे
बसवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. याबाबत मध्ये रेल्वेचे सीपीआरओ स्वप्नील नीला म्हणाले की,
सीएसएमटी ट्रॅक आणि कसारा ट्रॅकवरून दोन लोकल या ट्रॅकवर एकमेकांना क्रॉस करत होत्या. दोन लोकल आजूबाजूला येताच प्रवासी एकमेकांना धडकले आणि ट्रॅकवर पडले. प्रवासी ट्रॅकवर पडल्यानंतर स्थानिक लोकांनी त्यांना रुग्णालयात नेहण्याचे प्रयत्न केले . यानंतर रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींवर सध्या कळवा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. या अपघातात दोन्ही गाड्या लोकल होत्या. दोन्ही लोकल ट्रकमधले अंतर दीड ते दोन मिटर असते. मात्र, प्रवाशांच्या बॅगा मागे होत्या, त्यामुळे धक्का लागल्याचे प्रवाशाचे म्हणणे आहे. आता रेल्वेने उपाययोजना करण्यासंदर्भात नव्या लाईनचे
नियोजन केले आहेत. ठाणे ते सीएसएमटी सहाव्या लाईनपर्यंत अपग्रेड करण्यात येणार आहे. अशा प्रकारची ही पहिलीच घटना
घडली आहे. ज्यात दोन्ही बाजूनं लोकल जात असताना फूटओव्हरवर लोकं उभे असताना पडले. अपघातस्थळी
सीसीटीव्ही होते की नाही? लोकलमध्ये गर्दी किती होती? यासंदर्भात माहिती घेतली जाईल. याबाबत चौकशी केली जाईल.
काही जणांमध्ये लोकलमध्ये भांडणं सुरु होते, अशी देखील माहिती समोर येत आहे. याबाबत आम्ही तपास करत असल्याची
माहिती सीपीआरओ यांनी दिली आहे.
तर रेल्वे बोर्डाने निर्णय घेतला आहे की मुंबई उपनगरीय रेल्वेअंतर्गत तयार होणाऱ्या प्रत्येक कोचमध्ये ऑटोमॅटिक दरवाजे
तर बसवले जातील. याशिवाय सध्या वापरात असलेल्या मुंबई उपनगरीय लोकलच्या डब्यांचे पुनर्रचना (रीडिझाईनिंग) करण्यात
येणार आहे आणि त्यामध्ये देखील ऑटोमॅटिक दरवाजे बंद होण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती मध्ये रेल्वेचे सीपीआरओ स्वप्नील नीला यांनी दिली आहे. तर सुरुवातीला पुष्पक एक्स्प्रेसमधून हे प्रवासी पडल्याची माहिती
समोर आली होती. मात्र या अपघाताशी पुष्पक एक्स्प्रेसचा संबंध
नसल्याची माहिती स्वप्नील नीला यांनी दिली आहे. ही जरी माहिती खरी असली तरी निष्पाप लोकांना रेल्वेच्या ढिसाळ योजने मुळे आपला प्राण गमवावा लागला या गोष्टीला जबाबदार कोण , आणखी किती लोकांना रेल्वेच्या मनमानी कारभाराला सामोरे जावे लागणार आहे असे सर्वसामान्य नागरिकांकडून बोलले जात आहे.
