कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त पोंधवडी येथे रक्तदान शिबिर संपन्न
भिगवण/प्रतिनिधी
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान, रक्तदान करणारा व्यक्ती एखाद्याचे जीवन वाचवु शकतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे, याच अनुषंगाने कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त कै भगवानराव भरणे प्रतिष्ठान यांच्या वतीने अनिकेत भरणे यांच्या सौजन्याने पोंधवडी या ठिकाणी. समस्त ग्रामस्थ पोंधवडी यांच्या वतीने श्री हनुमान मंदिराच्या प्राणांगणामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन पाच जून रोजी केले होते, या रक्तदान शिबिरामध्ये 112 रक्तदात्यांनी रक्तदान केले , या शिबिरामध्ये महाराष्ट्र राज्याचे क्रीडा, युवकल्याण ,अल्पसंख्यांक व औ्फाक मंत्री दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरने यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली यांनी सदर कार्यक्रमांमध्ये आवर्जून सांगितले की वाढदिवस थाटामाटात साजरे न करता एखाद्याचा प्राण जर ब्लड डोनेट करणाऱ्या च्या एका ब्लड बँग ने वाचणार असेल तर असे उपक्रम करणे फार गरजेचे आहे कारण सध्या परिस्थितीमध्ये रक्ताचा फार मोठा तुटवडा भासत आहे आणि याच गोष्टीला अनुसरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्तदान करणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले , व पोंधवडी मध्ये अशा प्रकारचे रक्तदान शिबिराचे आयोजन केल्यामुळे समस्त नागरिक वर्गांचे यावेळी त्यांनी विशेष आभार मानले कार्यक्रमाचे आयोजन पोंधवडी येथील समस्त ग्रामस्थ नागरिकाकडून करण्यात आले , यावेळी प्रत्येक रक्तदात्याच एक भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला .
