ताज्या बातम्या

बंडगरवाडी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त अनुष्का ताई भरणे सह डॉ. शशिकांत तरंगे यांची उपस्थिती

Spread the love

                   भिगवन / प्रतिनिधी

दि 2 जून रोजी बंडगरवाडी या ठिकाणी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची तीनशे वी जयंती मोठ्या उत्साहात पार पडली पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतामध्ये अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या संख्येने साजरी होत असते. आहील्यादेवी होळकर यांनी 28 वर्ष उत्तमरीत्या राज्यकारभार केला. पतीच्या निधनानंतर त्याकाळी स्त्रीला फार मोठा संघर्ष करावा लागायचा मात्र या स्त्रीने आपले राज्य सुधारण्याचा वसा. हाती घेऊन उत्तम प्रशासक गोरगरीब जनतेची सेवा , भारतभर मंदिरे , धर्मशाळा धार्मिक सामाजिक कार्य करणारी कुशल नेतृत्वाद्वारे समाज हिताचे निर्णय घेणारी एक स्त्रीशक्ती म्हणजे आहिल्यादेवी होळकर , यांच्या आठवणीचा वसा सदैव जतन करण्याकरिता जयंती महोत्सव बंडगरवाडी या ठिकाणी साजरा करण्यात आला याप्रसंगी कै भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष सौ अनुष्काताई भरणे , महाराष्ट्र राज्य धनगर परिषद संस्थापक अध्यक्ष डॉ शशिकांत तरंगे पोंधवडी ग्रामपंचायत उपसरपंच डॉ तुळशीराम खारतोडे, पोंधवडी ग्रामपंचायत सदस्य संभाजी कोकरे, राष्ट्रवादी महिला अध्यक्ष सीमाताई काळंगे,, बंडगरवाडीच्या पोलीस पाटील शामल ताई पवार कुंडलिक बंडगर, हर्षवर्धन ढवळे श्री हनुमान विकास सोसायटीचे चेअरमन नानासाहेब बंडगर, मा तंटामुक्ती अध्यक्ष नारायण बंडगर मा उपसरपंच प्रदीप बंडगर , निलेश बंडगर, हे मान्यवर कार्यक्रमासाठी उपस्थित होते, प्रथमता यांच्या हस्ते प्रतिमित पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली, यानंतर मान्यवरांचे स्वागत आणि मान्यवरांचे मनोगत झाले, सीमाताई काळंगे यांनी जयंतीस शुभेच्छा तसेच डॉ शशिकांत तरंगे यांनी अहिल्यादेवी होळकर यांचा आपल्या वक्तृत्ववाने त्यांच्या कार्याला उजाळा दिला महापुरुषांच्या आचार विचार जोपासण्याचा सल्ला दिला त्याचप्रमाणे चौंडी येथे प्रत्येकाने जाऊन आशीर्वाद घेण्याचे आव्हान केले, चालू स्थितीला चांगली काम करा भविष्यकाळात चांगला जाण्याची खात्री दिली, कॅबिनेट मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या सुनबाणी अनुष्काताई भरणे यांनी समस्त ग्रामस्थ नागरिक तसेच जयंती महोत्सव साजरा करणारा तरुण वर्गांना शुभेच्छा देऊन विशेष महिलांनाही कणखर आणि ताटर बनण्याचा सल्ला दिला, कार्यक्रमाचे आयोजन बंडगरवाडी येथील समस्त तरुण व ग्रामस्थांनी केले, कार्यक्रमासाठी आसपास परिसरातील नागरिक व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *