मदनवाडी वीरवाडी येथे मोटर वायडिंग दुकानात चोरी
दोन लाख 38 हजार 800 माल चोरीस
भिगवण/प्रतिनिधी
गेले काही दिवसापासून चोरीचे आसपास सत्र गावांमध्ये सुरू आहे , याच पार्श्वभूमीवर मदनवाडी विरवाडी या ठिकाणी मोटर वाइंडिंग दुकानातून दोन लाख 38 हजार 800 रुपयाचा माल अज्ञात चोरट्याने 30 मे रोजी सायं आठ ते सकाळी नऊच्या सुमारास माल चोरून नेण्याची घटना घडली आहे . याची फिर्याद भिगवन पोलीस स्टेशनमध्ये
फिर्यादी महेंद्र मोहन भोंडवे वय 31 वर्ष व्यवसाय मोटार वायडींग शॉप रा. तक्रारवाडी ता.इंदापुर जि. पुणे यांनी आरोपी-अज्ञात इसम विरोधात दिली आहे, 30. मे रोजी रात्रौ 08/00 वा ते दि 31 मे रोजी सकाळी 9/०० वा चे दरम्यान मौजे वीरवाडी मदनवाडी ता इंदापुर जि पुणे येथे चोरीला माल गेला आहे 1,78,200/- किंमतीची 180 किलो वजनाची प्रत्येकी 990 रुपये प्रती किलो मोटार वायडींगची कॉपर वायर 45,000/- 50 किलो वजनाचे प्रती किलो 900 रुपये पितळी बुशींग
15,600/-रुपये किंमतीची 20 किलो स्क्रैप कॉपर वायर प्रती किलो 780 रुपये प्रमाणे एकूण 2,38,800/- रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला आहे
हकीगत. अशी फिर्यादी.महेंद्र मोहन भोंडवे यांचे मोटार रिवायडींग चे रोहन ट्रेडर्स नावाचे शाँप चे बंद शटरचे कडी तोडुन त्यावाटे आत प्रवेश करुन दुकानाचा दरवाजा उघडुन त्यामध्ये ठेवलेले वरील वर्णन असलेला माल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करुन चोरुन नेले आहे. सदर गुन्ह्याचा तपास पो हवा उगले
पो हवा मुळीक
प्रभारी आधिकारी- सपोनि महांगडे हे करीत असून सदर गुन्ह्यातील आरोपींना शोधण्याची मोठी जबाबदारी यांच्याकडे असेल कारण भविष्यातील अशा प्रकारचा गुन्हा घडू नये म्हणून चोरट्यांचा वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे आहे असे व्यापार वर्गातून बोलले जात आहे
