मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या स्वागताला इंदापूरातील दोन बड्या राजकीय नेत्यांचा उपस्थितीने राजकीय चर्चांना उधान
भिगवन /तुकाराम पवार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपले कुलदैवत इंदापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र निरा नरसिंहपूर येथे लक्ष्मीनृसिंहाच्या दर्शनासाठी आल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यासाठी सर्वपक्षीय नेतेमंडळी आली होती.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये जाऊन निवडणूक लढविलेले माजी मंत्री
हर्षवर्धन पाटील व सोनाई परिवाराचे सदस्य प्रवीण माने यांच्या उपस्थितीने राजकीय चर्चाना उधाण आलं आहे.
पाटील यांनी सांगितले की, मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस हे पहिल्यांदाच इंदापूरच्या दौयावर येत आहेत. मुख्यमंत्री आपल्या मतदारसंघात येत असल्याने त्यांचे स्वागत करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत.
विधानसभेची निवडणूक अपक्ष लढविलेले प्रवीण माने हे देखील दौडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांच्याबरोबर हेलिपॅडवर मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी आल्याने त्यांची देखील चर्चा सुरू होती. माने आणि त्यांच्या
परिवर्तन विकास आघाडीतील प्रमुख नेतेमंडळी या वेळी आवर्जून उपस्थित असल्याचे दिसून आले
राज्याचे कीड़ा युवक कल्याणमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, आ. विजय शिवतारे, आ. राहुल कुल, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, पद्यजदेवी मोहितेपाटील, पृथ्वीराज आचक, बाळासाहेब गावडे, रंजन तावरे, मयूरसिंह पाटील, हनुमंत कोकाटे, तेजस देवकाते आदी मान्यवरांनी फडणवीस यांचे स्वागत केले.
