इंदापूरताज्या बातम्यापुणे

मदनवाडी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची दिवाळी सरपंच अश्विनीताई बंडगर यांनी केली गोड!

Spread the love

 

कर्मचाऱ्यांना, बोनस , सह कपड्यांची भेट; दिवाळीनिमित्त आनंदाचे वातावरण

भिगवन| प्रतिनिधी

दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, आपुलकी आणि माणुसकीचा सण! या सणाचे औचित्य साधत मदनवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच अश्विनीताई मारुती बंडगर यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड केली आहे. कर्मचाऱ्यांना वेळेवर  बोनस, पगाराइतपत, व सर्व कर्मचारी बांधवांना कपड्यांची भेट देत त्यांनी सामाजिक बांधिलकी आणि कर्मचारी वर्गाप्रती असलेली आपुलकी जपली आहे.

ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजात कर्मचारी वर्गाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. गावातील स्वच्छता, पाणीपुरवठा, नागरिकांना विविध सेवा उपलब्ध करून देणे तसेच ग्रामपंचायतीची प्रशासकीय कामे पार पाडण्यात कर्मचारी सातत्याने योगदान देत असतात. त्यांच्या या कामाची दखल घेत दिवाळीसारख्या आनंदाच्या सणात त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद फुलविण्याचा प्रयत्न सरपंच अश्विनीताई बंडगर यांनी केला.

यावेळी कर्मचाऱ्यांना बोनस नवीन कपड्यांची भेट मिळाल्याने त्यांच्या आनंदात भर पडली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिळालेल्या या भेटीमुळे कर्मचारी वर्गात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. केवळ प्रशासकीय जबाबदारी न निभावता कर्मचाऱ्यांच्या आनंदात सहभागी होण्याची भावना या उपक्रमातून दिसून आली.

यासंदर्भात सरपंच अश्विनीताई मारुती बंडगर यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, दिवाळी हा प्रत्येक कुटुंबासाठी आनंदाचा आणि महत्त्वाचा सण आहे. विशेषतः गोरगरीब आणि सर्वसामान्य कुटुंबांसाठी या सणाला विशेष महत्त्व आहे. आपल्या ग्रामपंचायतीतील कर्मचारी आनंदी असतील, त्यांच्या कुटुंबात समाधानाचे वातावरण असेल, तर आम्हालाही आनंद वाटतो. कर्मचारी वर्ग आनंदी राहणे हीच आमच्यासाठी समाधानाची बाब आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

सरपंच अश्विनीताई बंडगर यांच्या या उपक्रमाचे कर्मचारी वर्गातून समाधान व्यक्त होत असून, दिवाळीच्या निमित्ताने दाखविलेली आपुलकी आणि सहकार्याची भावना निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे. सण केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता आपल्या सोबत काम करणाऱ्या माणसांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यातच खऱ्या दिवाळीचे सार आहे, याचा प्रत्यय मदनवाडी ग्रामपंचायतीच्या या उपक्रमातून आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *