इतरइंदापूरपुणे

भिगवन पोलीस स्टेशनच्या” शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे सह अंमलदार सचिन पवार यांना उत्कृष्ट सेवा पदकाने सन्मानित;!

Spread the love

  • भिगवन /प्रतिनिधी

कुठलेही काम असो ते जर काम प्रामाणिक असेन तर त्याचे फळ चांगले मिळते ,याचा ज्वलंत उदाहरण म्हटलं तर भिगवन पोलीस स्टेशनचे दोन अधिकार
भिगवण पोलीस स्टेशन ,
प्रभारी अधिकारी सोमनाथ सिंधु पांडुरंग शेंडगे , सहा . पोलीस निरीक्षक , व पोलीस अंमलदार सचिन रतन अशोक पवार , यांनी आपल्या कामाच्या कामगिरीवर हे शिखर गाठले आहे, कारण सहाय्यक पोलीस निरीक्षक भिगवन सोमनाथ शेंडगे यांनी पोलीस खात्यामध्ये दाखल होतात, नक्षलवादी भागामध्ये मध्ये आपली सेवा बजावली, त्याचप्रमाणे एटीएस मध्ये काही काळ सेवा केली तर नंतर कंट्रोल विभाग हडपसर या विविध ठिकाणी सेवा बजवत असताना , त्यांनी आपल्या कामाशी प्रामाणिक राहून, काम केले आणि भिगवन पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारल्यानंतर, त्यांच्या कामाची दखल घेऊन, पोलीस खात्यामध्ये उल्लेखनिय निष्कलंक उत्कृष्ट सेवेबदद्ल
भारत सरकार , गृह मंत्रालय यांचेकडुन सन २०२६ भिगवण पोलीस स्टेशन , पोलीस निरीक्षक व पोलीस अंमलदार सचिन रतन अशोक पवार यांनी केलेल्या उल्लेखनीय व गुणवतापुर्ण कामगिरीची दखल घेवुन मा . पोलीस महासंचालक सो , महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेकडुन उत्कृष्ट सेवा पदक व प्रशस्तीपत्रक
भारताच्या स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी प्रधान करण्यात आले, भिगवण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे व अंमलदार सचिन पवार यांच्याशी वार्तालाभ केले असता यांनी सांगितले की काम करत गेलो , चांगले काम केले तर त्याचेही चांगले फळ मिळाले आणि इथून पुढेही प्रामाणिक व निष्कलंकपणे काम करणार असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले, मिळालेल्या सन्मानाने भिगवण सह आसपास गावातील नागरिकाकडून सदर दोन्ही अधिकारी वर्गाचे कौतुक होत असून भिगवण पोलीस स्टेशनला मिळालेला असा अधिकारी लाभल्याने भिगवन व भिगवण पंचक्रोशीत शांतता सुव्यवस्था कायदा सुरळीत सुरू असल्याने ही नागरिक वर्गामध्ये समाधानकारक वातावरण आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *