कला विद्यालय भिगवन’ येथे नशामुक्त भारत अभियान व ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम संपन्न!
भिगवण : प्रतिनिधी
दि,१३ ऑगस्ट रोजी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, भिगवण येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘नशामुक्त भारत अभियान’ तसेच ऑगस्ट क्रांतिदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्ती, सामाजिक बांधिलकी आणि देशभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी व विभाग समन्वयक डॉ. अनिल बनसोडे यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक राजयोगिनी ब्रह्माकुमारी मंजुषा दीदी, संचालिका, सेवाकेंद्र बारामती तथा प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, राजस्थान यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांचे दुष्परिणाम, व्यसनापासून दूर राहण्याचे महत्त्व आणि निरोगी जीवनशैली याविषयी मार्गदर्शन केले.
तसेच ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त डॉ. सुरेंद्र शिरसट यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील ऑगस्ट क्रांतीचे महत्त्व, स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान आणि देशाच्या प्रगतीमध्ये युवकांची भूमिका याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तानाजी मगर होते. त्यांनी विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवून समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवावा तसेच देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी जबाबदार नागरिक म्हणून योगदान द्यावे, असे आवाहन केले.
यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. प्रज्ञा लामतुरे , प्रा. गणेश मोरे, प्रा. प्रकाश करे, प्रा. सचिन आरडे महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रा. धनाजी मत्रे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. समीर बळे तसेच प्रा.विनोद भुजबळ यांनी केले.

