इतर

आगर मंडळातील ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांवर “स्टिंग ऑपरेशन!

Spread the love

महासेतू केंद्रांची तपासणी मोहीम; तालाठी व मंडळ अधिकाऱ्यांची संयुक्त कारवाई

कंचनपूर अकोला/ प्रतिनिधी:-

आपले सरकार सेवा केंद्रावर, कार्यालयात होणाऱ्या नागरिकांची गैरसोय व केंद्रात होणाऱ्या गैरव्यवहार प्रकरणी प्रशासन ॲक्शन मोडवर आलेले दिसून येत आहे नागरिकांच्या होणाऱ्या वारंवार तक्रारी व गैर स्वयं बाबत अखेर प्रशासन आपले सरकार सेतू केंद्रावर जाऊनचौकशी करत आहे  , अकोला जिल्ह्यातील आगर मंडळात ‘आपले सरकार’ व महासेतू सेवा केंद्रांची तपासणी मोहीम राबविण्यात आली. मंडळ अधिकारी टाले व संबंधित तलाठी यांच्या उपस्थितीत विविध गावांमध्ये केंद्रांची पडताळणी करून सेवा गुणवत्तेचा आढावा घेण्यात आला.

अकोला जिल्ह्यातील आगर मंडळात प्रशासनाकडून ‘आपले सरकार’ सेवा केंद्रे आणि महासेतू केंद्रांची व्यापक तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. नागरिकांना शासनाच्या सेवा पारदर्शक व सुलभ पद्धतीने मिळाव्यात, यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. या तपासणी मोहिमेत मंडळ अधिकारी टाले यांच्या नेतृत्वाखाली निंभोरा येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) राऊत, सांगवी बु. येथील ग्राम महसूलअधिकारी (तलाठी) पठाण मॅडम यांनी सहभाग घेतला. कंचनपूर येथील सेतू केंद्रासह विविध गावांतील सेवा केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. तपासणी दरम्यान केंद्रांमधील सेवा प्रक्रिया, नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांची गुणवत्ता, तसेच आवश्यक कागदपत्रांची पडताळणी यावर विशेष भर देण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिवशंकर पाटील हे देखील उपस्थित होते. आगर मंडळातील धामना, आगर, पाळोदी, मोरगाव, भाकरे, बादलापूर, कंचनपूर, खांबोरा, भौरद, भोड, नेराट, वैराट, गोपाल खेळ आणि गांधीग्राम या गावांमध्ये ही तपासणी मोहीम राबविण्यात आली. या कारवाईमुळे सेवा केंद्रांच्या कामकाजात शिस्त येण्यास मदत होणार असून नागरिकांना जलद व पारदर्शक सेवा मिळण्यास चालना मिळणार आहे. प्रशासनाने यापुढेही अशा तपासण्या सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत. अशा होणाऱ्या कार्यवाहीमुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे व अशा कार्यवाही बद्दल नागरिकांना कडून यांचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *