राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आदर्श माध्यमिक विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन
भिगवण दि. 08 वार्ताहर :-
आदर्श विद्यालय भिगवन या ठिकाणी अध्ययना सह मुलांचे बौद्धिक कला क्रीडा यांचा विकास होण्याकरता नेहमी मुलांच्या हितासाठी वेगवेगळे उपक्रम घेतले जातात जेणेकरून विद्यार्थी विद्यालयातून अध्ययन करून बाहेर पडून सर्व गुण संपन्न व्हावा हा उद्देश, याच गोष्टीला अनुसरून भिगवण ता.इंदापूर येथील साईनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित विविध वैज्ञानिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती मुख्याध्यापिका सुचिता साळुंके यांनी दिली.
राष्ट्रीय दिनानिमित्त आदर्श माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या आधुनिक तंत्रज्ञान, नवनवीन वैज्ञानिक संशोधन, अवकाश संशोधन या विषयांवर वैज्ञानिक प्रकल्पांच्या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच निबंध स्पर्धा , रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा , माझी शाळा – माझी प्रयोगशाळा , समृद्ध प्रयोगशाळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.चंद्रकांत खानावरे व सर्व संचालक यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे व विद्यालयाच्या उपक्रमाचे कौतुक केले आहे. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापिका सुचिता साळुंके ,विज्ञान शिक्षिका सुनिता पोटफोडे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. यावेळी मुख्याध्यापका सह सर्व शिक्षक वृंदांचे पालक वर्गातून विशेष कौतुक होत आहे कारण एक शिस्तप्रिय असलेले आदर्श विद्यालय, सुसज्ज अशी भव्य इमारत, मोठे प्राणांगण खेळण्यासाठ अशी वैशिष्ट्ये असणाऱ्या विद्यालयांमध्ये, अशा उपक्रमाद्वारे मुलाना एक योग्य दिशा मिळते. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा उचलणाऱ्या सर्व शिक्षक वृंदांमुळे आदर्श विद्यालय कडे पाहण्याचा दृष्टिकोन एक वेगळाच आहे याच मुळे विद्यालयांमध्ये अगदी कमी दिवसांमध्ये भरपूर विद्यार्थी अध्ययन करून येथून शिक्षण घेऊन गेलेले विद्यार्थी चांगल्या प्रकारे घडून गेलेले आहेत, म्हणून अशा स्तुप्त उपक्रमाचे नेहमीच कौतुक होत आहे.

