इंदापूरकृषीताज्या बातम्या

उपबाजार भिगवणमध्ये नविन ज्वारी प्रति क्विंटल रु. 6,101/- उच्चांकी दराने विक्री- सभापती . तुषार जाधव

Spread the love

भिगवण/प्रतिनिधी:

उपबाजार भिगवण भुसार, मासे(मासळी) व शेळी-मेंढी बाजाराकरीता प्रसिद्ध बाजारपेठ आहे. इंदापूर बाजार समितीच्या मुख्य व उपबाजाराच्या ठिकाणी शेतमाल उघड लिलावाने विक्री, चोख वजनमाप व विक्रीनंतर शेतकऱ्यांना हिशोबपट्टी, त्वरीत रक्कम अदा केली जाते. बाजार समितीने उपबाजार भिगवण 60 मे. टन व राशीन रोडलगत बाजार आवारात 100 मे. टन क्षमतेचे भुईकाटा (वे-ब्रिज) असुन त्यांची 24 तास सेवा उपलब्ध आहे. सद्या मका शेतमालाचे दर कमी झाल्याने इंदापूर बाजार समितीने मका हमीभाव दरात खरेदी केंद्र सुरु केल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. असे मत बाजार समितीचे मार्गदर्शक पुणे जिल्हा बँकेचे संचालक तथा माजी सभापती श्री. आप्पासाहेब जगदाळे यांनी व्यक्त केले आहे.
उपबाजार भिगवण येथील भुसार मार्केटमध्ये रविवार दि. 01 मार्च-2026 रोजी नविन ज्वारीची, गहू व हरभरा शेतमाल आवक सुरु झालेली आहे. श्री. दिपक मचाले यांच्या आडतीवर ज्वारीला प्रति क्विंटल रु. 6,101/- अश्या उच्चांकी दराने श्री. महावीर वडुजकर यांनी खरेदी केली. भुसार शेतमाल खरेदीकरीता श्री. बाळासाहेब फराटे, . मिलिंद सालपे, कल्पेश सोनवणे, श्री. सचिन सातव, . राज मचाले, . यश संघवी, . विजय झांबरे, . राम उदावंत, . संतोष टाटीया, . माऊली जगदाळे, . अमोल केसकर, . सतीश गावडे, . प्रणव बागल, श्री. अशोक बलघट, श्री. नवनाथ गाढवे, श्री. मयुर सालपे, श्री. उमेश सोनवणे, . अशोक बंडगर खरेदीकरीता व्यापारी उपस्थित होते.
शेतकरी बांधवांनी बाजार समितीचे विविध योजना व उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन इंदापूर बाजार समितीचे सभापती . तुषार जाधव, उपसभापती . मनोहर ढुके, माजी सभापती मा. आप्पासाहेब जगदाळे यांनी केलेले आहे. यावेळी संचालक माजी आमदार  यशवंत माने,  विलासराव माने,  दत्तात्रय फडतरे, . मधुकर भरणे, . रोहित मोहोळकर,  संग्रामसिंह निंबाळकर,. संदिप पाटील,. रुपालीताई संतोष वाबळे,  मंगलताई गणेशकुमार झगडे,  आबा देवकाते, . संतोष गायकवाड,  अनिल बागल,. दशरथ पोळ, . रोनक बोरा, . सुभाष दिवसे व प्र. सचिव . संतोष देवकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *