पुणेसंस्कृती

स्माज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे , यांची जी. प . प्रा. शाळा पोंधवडीला भेट

Spread the love

चिमुकल्या सोबत संवाद साधताना मान्यवर

भिगवन/ प्रतिनिधी 

20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता स्माज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे, यांनी भेट दिली, खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाचल्या पाहिजे जेणेकरून गोरगरीब विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षणाचे दालन सतत खुले राहील, तसेच या शाळेतून दर्जेदार गुणवंत विद्यार्थी घडावा ह्या हेतून, स्माज इंडिया प्राइवेट लिमिटेड पुणे यांच्या वतीने सी एस आर फंडातून, शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पिण्याच्या पाण्याचे एरो फिल्टर प्लॅट, लहान मोठे चाळीस बेंच, अंगणवाडीसाठी लहान खुर्च्या आणि टेबल, एरो फिल्टर चे शेड, विद्यार्थ्यांची टॉयलेट दुरुस्ती, मोठा पीयूसी कट्टा, इलेक्ट्रिक साहित्य, आणि शिक्षकांकरिता टेबल, या मार्फत त्यांनी शाळेला दिले, खऱ्या अर्थाने एवढे मोठे साहित्य देऊन ते सतकार्याला गेले आहेत का किंवा त्याची योग्य प्रकारे वापर झाला आहे का या निमित्ताने, खास जर्मनीवरून मिस स्माज  डायरेक्टर स्माज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे, तसेच स्माज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर फिलिप सर, पुणे येथील प्रसिद्ध एनजीओ निशा जोशी, कंपनी एच आर मॅनेजर गाडेकर साहेब, हे उपस्थित होते, यांनी यावेळी प्रत्येक वर्गात जाऊन मुलांमध्ये संवाद साधून दिलेल्या वस्तू योग्य प्रकारे वापर होतो का नाही पाहिले व यांनी दिलेल्या गोष्टीमुळे नक्कीच विद्यार्थ्यांवर याचं चांगला प्रकारे परिणाम झाला असून शाळेमध्ये मुलांचं उत्साह चांगल्या प्रकारे वाढला हे त्यांनी आवर्जून सांगितले, यावेळी पोंधवडी शाळेची शिक्षक अवघडे गुरुजी, यांनी कार्यक्रमाचं आयोजन केले सर्व अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे सर्व मान्यवरांचे  मा सरपंच  नानासाहेब अर्जुन बंडगर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन सन्मान केला, त्याचप्रमाणे पुढील काळामध्ये अशाच प्रकारचे मदत केल्याने विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना वाव देण्याकरता आणखी मदत होण्याची ही इच्छा व्यक्त केली, मान्यवरांनीही विद्यार्थ्यासोबत मनसोक्त संवाद साधला , व आम्ही करत असलेल्या कार्यक्रम किंवा मदत ही सत कार्याला पोहोचली याबाबत समाधान व्यक्त केले, व पुढील वाटचालीस मुलांना शुभेच्छा सर्व मान्यवरांनी दिल्या, यावेळी यांच्या संपूर्ण पद अधिकाऱ्यांनी मुलांसाठी शेवटी खाऊ वाटप केले, यावेळी पोंधवडी गावचे मा सरपंच नानासाहेब अर्जुनराव बंडगर सह गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार शिक्षक वृंद अवघडे गुरुजी यांनी केले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *