इंदापूरपुणेसंस्कृती

” गणेशोत्सव’ निमित्त भिगवन पोलीस स्टेशन मध्ये मंडळातील पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न!

Spread the love

भिगवण/प्रतिनिधी

भारतातील सर्वात मोठा मानला जाणारा उत्सव म्हटलं तर गणेशोत्सव गणला जातो याच पार्श्वभूमीवर या उत्सवा दरम्यान कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये या अनुषंगाने भिगवन पोलीस स्टेशन मध्ये दि, 2 सप्टेंबर रोजी रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कदम बारामती विभाग बारामती यांचे अध्यक्षतेखाली पो स्टे हद्दीतील गणेश मंडळाचे पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये मंडळांना
इतर सर्व विभागाच्या संमती घेऊन परवानगी अर्ज मुदतीत करणे, मंडपात CCTV बसविणे,
24 तासाकारीता 2 स्वयंसेवक नेमणे,
फ्लेक्स, बॅनर वर धार्मिक भावना, आक्षेपार्ह मेसेज टाकण्यात येऊ नयेत, सराईत गुन्हेगारांचे फोटो कोणीही लावणार नाहीत, फ्लेक्स बॅनर करीता योग्य विभागाच्या परवानगी घेऊन मुदतीत काढून घेणे,
समाज हितकारक विषय जसे की नो ड्रगस, सेव्ह चाईल्ड, वृक्ष संवर्धन, वाहतूकीचे नियम पाळणे या बाबत जनजागृती करणे,
मिरवणूक मार्गात बदल न करणे, मस्जिद, शासकीय कार्यलयासमोर, हॉस्पिटलजवळ स्पीकर बंद करणे, ध्वनी प्रदूषण कायद्याचे पालन करणे
विसर्जन घाटावर दक्षता घेणे
भिगवण पोलीस स्टेशन व भिगवण पत्रकार संघ यांचे संयुक्त सहभागातून 3 उत्कृष्ठ गणेश मंडळांची निवड करून त्यांना बक्षिस देण्यात येणार आहे
वरील सूचनांचे पालन न केल्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होऊन कायदा व सुव्यवस्थितेचा भंग झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल
याबाबत सूचना व मार्गदर्शन करण्यात आले या मागचा उद्देश एकच की हा उत्सव शांतता पूर्व व्हावा जेणेकरून अशा सणांना गालबोट लागणार नाही याची काळजी मंडळातील सदस्यांनी घेणे जरुरी असल्याचे उपविभागीय अधिकारी कदम यांनी सांगितले, यावेळी भिगवन पोलीस स्टेशनची सहाय्यक पोलीस निरीक्षक शेंडगे यांनीही मंडळातील पद अधिकार्‍यांना मार्गदर्शन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *