“अवैद्य धंद्यावर” बारामती तालुका पोलिसांची धाड!
बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी अवैध धंद्यावर छापे
दोन ठिकाणी 4400 रुपये किमतीची दारू जप्त
बारामती /प्रतिनिधी
बारामती तालुका पोलीस प्रशासनाचे अवैद्य धंद्यावर कडवी नजर असून, ज्या ठिकाणी अवैधरीत्या दारू दारू धंदा सुरू आहे यांची कुठल्याच प्रकारे गय केले जात नसल्याचे नसल्याचे दिसून येत आहे , यांचा एकच उद्देश की तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कायदा सुव्यवस्था व अवैद्य धंद्यांना वेळीच चाप बसेन, याच गोष्टींना अनुसरून
दि. एक सप्टेंबर रोजी बारामती तालुका पोलिसांनी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैद्य धंद्या विरुद्ध वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली त्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असता महिलां नामे गिताबाई अशोक अडागळे राहणार तांदुळवाडी हिचे कडे 2800 रुपये किमतीची देशी दारू मिळाली तसेच महिलां नामे अलका रामचंद्र दुबळे राहणार तांदुळवाडी हीच्याकडे 1600 रुपये एवढ्या किमतीची देशी दारू मिळाली त्यांच्याविरुद्ध दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार एकशिंगे, उगले, वाघ,खारतोडे यांच्या पथकाने केली आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार उगले व पोलीस हवलदार खारतोडे करीत आहेत,
खऱ्या अर्थाने अशा होणारा वेगवेगळ्या छापी मारे वर ग्रामस्थांकडून पोलीस वर्गाचे विशेष कौतुक होत असल्याचे दिसून येत आहे,

