६७ वर्षीय नराधमाचा ‘भादलवाडी येथे ,अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार!
६७ वर्षीय नराधमाला भिगवन पोलिसांनी केले जेरबंद,
भिगवन/ प्रतिनिधी
एकंदरीत पाहता संपूर्ण राज्यांमध्ये नक्की काय सुरू आहे हे समजण्याच्या पलीकडचं होऊन गेल आहे, मनुष्य हा खूप मोठा क्रूर बनत चालला आहे, कारण नुकतंच घडलेलं नसरापूर सारखं गंभीर प्रकरण असो किंवा, अल्पवयीन मुलींवर होत असलेले सतत अत्याचार असो हे प्रकरण काही थांबण्यास तयार नाही , याची प्रचिती पुन्हा एकदा घडून आली आहे, भादलवाडी ता , इंदापूर पुणे येथे एका नात्याला काळिंबा फासणारी घटना घडली आहे, एका ६७ वर्षीय इसमाने फिर्यादी च्या सख्या चुलत्याने फिर्यादीच्या मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे, सदर घटनेची फिर्याद मंगल भोलेनाथ तुपे रा, भादलवाडी सध्या राहणार हडपसर यांनी आरोपी शिवाजी चंद्रकांत दनाने वय वर्ष ६७ रा भादलवाडी ता इंदापूर, पुणे यांच्या विरोधात ३० जुलै २०२६ रोजी भिगवन पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली आहे. हकीकत अशी की,
आरोपी शिवाजी चंद्रकांत दनाने फिर्यादीचे सखे चुलते असून फिर्यादी यांच्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला हातपाय दाबण्याच्या बहाण्याने घरांमध्ये बोलवून, तिच्या मतिमंद असण्याच्या फायदा घेऊन ,तिच्यावर जबरदस्ती केल्याची घटना २४ जुलै रोजी ११ते ३ च्या दरम्यान घडली आहे,सदर मुलीचे वय १४ वर्षे ०५ महिने अल्पवयीन व मतिमंद असून हे माहीत असताना देखील तिच्यावर जबरदस्ती केली , याच पार्श्वभूमीवर सदर आरोपीस विविध कलम द्वारे व फोक्सो कायदा अंतर्गत दि ३० जुलै रोजी अटक केली आहे. वास्तविक पाहता आरोपीस अटक होईल सजाही होईल, मात्र त्या चिमूरड्यांचं काय,? ज्या वया मध्ये निरागस मुलींनी खेळायचे बागडायचे वय असते त्यांना अशा भयानक विकृतीचा सामना करावा लागतो, खरंच भारता मध्ये लहान मुली, स्त्रिया सुरक्षित आहे का याचे विचार विमांमसा करणे सध्या गरजेचे आहे, अशी गैरकृत्य करण्यास नराधमांचे धाडस कसे होते याच पार्श्वभूमीवर नुसतं आरोपीस सजा देने किंवा कोर्ट कचऱ्या करण्यापेक्षा, बाहेर देशांमध्ये ज्या प्रकारचा कायदा आहे त्या प्रकारचा कायदा केला तर ऑन द स्पॉट अत्याचार करणाऱ्या नराधमाला चौकामध्ये गोळ्या घालून ठार केले पाहिजे. तर खरा अर्थाने पीडितांना न्याय मिळेल आणि अशा प्रकारचे गैर कृत्य करण्यास शंभर वेळा नराधमाला विचार करावा लागेल, अशा प्रकारचा सर्व सामान्य जनतेतून सूर येऊ लागला आहे,
या घटनेचा पुढील तपास भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे करत आहे.

