इंदापूरवैशिष्ट्यीकृत

भिगवन कला विद्यालयाची,स्वयंसेविका कु काजल गुळवे हिची.राष्ट्रीय सेवा योजना पुणे ते पंढरपूर राज्यस्तरीय शिबीरासाठी  निवड”!

Spread the love

भिगवन /प्रतिनिधी 

कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय भिगवण येथील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेविका कु काजल श्रीकृष्ण गुळवे टी. वाय. बी.एस्सी. हिची “राष्ट्रीय सेवा योजना पुणे ते पंढरपूर राज्यस्तरीय शिबीरासाठी” निवड झाली आहे.  हिची दि. ०९ जुलै ते २५ जुलै २०२६ रोजी दरम्यान आयोजित, “राष्ट्रीय सेवा योजना पुणे ते पंढरपूर एन. एस. एस. दिंडी राज्यस्तरीय शिबीरासाठी” निवड झाली आहे.

यासाठी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे “पुणे ग्रामीण विभागाचे” विभागीय समन्वयक डॉ अनिल बनसोडे यांनी अथक परिश्रम घेतले आहे.

कु. काजल श्रीकृष्ण गुळवे हिच्या “राष्ट्रीय सेवा योजना पुणे ते पंढरपूर एन. एस. एस. दिंडी राज्यस्तरीय शिबीरासाठी निवडीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत असून, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ तानाजी मगर आणि इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन पाटील यांनी अभिनंदन केले आहे. खऱ्या अर्थाने विद्यालयामध्ये घेतले जाणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे वेगवेगळ्या स्वच्छता अभियानाद्वारे विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी शिबिर घेऊन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय सेवा बद्दल एक परिवर्तन घडवण्याचे कार्य विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंदही करत असतात त्यांच्याही कार्यास सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *