इतरताज्या बातम्याबारामती

बारामती तालुका पोलिसांनी केले शाळेमध्ये  अंमली पदार्थ विरोधात मुलांना  मार्गदर्शन!

Spread the love

अंमली पदार्थ  जनजागृती मोहिमेअंतर्गत विद्या प्रतिष्ठान कॉलेज विद्यानगरी बारामती येथील विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन

बारामती :-, प्रतिनिधी

 बारामती तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण पवार हे  अमली पदार्थ जनजागृती  अंतर्गत विद्या प्रतिष्ठान कॉलेज बारामती या ठिकाणी विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन केले  दि 01/ जुलै 2026 रोजी दुपारी 12.30 वा. ते 02.00 वा.या वेळेत बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील विद्या प्रतिष्ठान कॉलेज विद्यानगरी बारामती येथे “अंमली पदार्थ जनजागृती मोहीम” अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
सदर कार्यक्रमामध्ये पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे सेवन केल्याने होणारे शारीरिक, मानसिक, सामाजिक व आर्थिक दुष्परिणाम, त्यापासून होणारे नुकसान तसेच अमली पदार्थांपासून दूर राहण्याचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.तसेच अंमली पदार्थमुक्त समाज घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः जागरूक राहून इतरांमध्येही जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले.अंमली पदार्थांचे विक्री बाबत गोपनीय माहिती देणे बाबत शिक्षक विद्यार्थी व पालकांना आवाहन करण्यात आले.तसेच कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.उपस्थित विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सदर कार्यक्रमासाठी पोलीस निरीक्षक नारायण पवार, विद्या प्रतिष्ठान कॉलेजचे प्राचार्य भारत शिंदे , उपप्राचार्य अंकुश खोत, पोलीस उपनिरीक्षक शिंगाडे , पोलीस उपनिरीक्षक बगाडे , पोलीस अंमलदार वाकळे,महिला पोलीस अंमलदार पोतेकर, विद्या प्रतिष्ठान कॉलेज कडील ज्योती जगताप, अंकिता चौधर, नाझनीन खान, मुक्ता कडणे इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *