गॅसचा काळाबाजार करणाऱ्यावर कडक कारवाई करणार-पुरवठा निरीक्षण अधिकारी सपन गडमवार
भिगवन / प्रतिनिधी:-
आखाती देशाच्या युद्धजन परिस्थिती मुळे संपूर्ण भारत देशामध्ये गॅसचा तुटवडा भासू लागला आहे, अनेक उद्योगही गॅस अभावी ठप्प करण्यात आले आहेत, मात्र घरगुती गॅस धारकांना थोड्याफार प्रमाणात दिलास मिळाला आहे. मात्र कनेक्शन साठी सर्व सामान्य नागरिकांना गॅस मिळवण्याकता तासन तास रांगेमध्ये उभा राहुन कसाबसा थोड्याफार प्रमाणात नागरिकांना मिळत आहे मात्र गॅसचा काळाबाजार राज रोज पणे होत असल्याचे काही ठिकाणी पहावयास मिळत आहेत. ही परिस्थिती शासनाच्या निदर्शनात आल्याने शासनही ॲक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे, या परिस्थितीमुळे इंदापूर तालुक्यातील पुरवठा विभाग काळाबाजार रोखण्यासाठी ॲक्शन मोडवर आल्याचे पहावयास मिळाले आहे यांनी काळाबाजार करणाऱ्यांना कडक शब्दात इशारा दिला आहे यांनी आवर्जून सांगितले आहे की देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर परगुती गॅसचा तुटवडा होण्याची शक्यता असून इंदापूर तालुक्यामध्ये गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही या पुढील काळात दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल घरगुती गॅस व्यवसाय करण्या साठी वापरल्यास तसेच अवैध पद्धतीने साठा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्याचा अहवाल जिल्हा पुरवठा विभागाकडे पाठवून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, तरी नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, इंदापूर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष टीम तयार करण्यात आली असून तालुक्यातील गॅस आणि इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व गॅस एजन्सीना कडक सूचना देण्यात आल्या आहेत.झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला असून सर्व गॅस एजन्सीना इंदापूर तालुक्याचे पुरवठा निरीक्षण अधिकारी सपन गडमवार यांनी कडक इशारा दिला आहे.

