बिल्ट कंपनीच्या” गेट समोर अज्ञात वाहनाच्या धडकेत भिगवन चा इसम जागीत मृत्यू,
भिगवन / प्रतिनिधी:-
चालू परिस्थितीमध्ये महामार्गावरती अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने निष्पाप नागरिकांना आपला विनाकारण जीव गमवा लागत आहे , त्यातच वाहनधारक अपघात स्थळी न थांबता निघून जात असलेल्या कारणास्तव उपचाराअभावी काही नागरिकांना आपला प्राण गमवावा लागत आहे खरोखरच या गोष्टीला गांभीर्याने घेण्याची गरज आहे, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कुटुंब प्रमुख काबाडकष्ट करून घरी येण्याच्या मार्गावरच अशा अज्ञात वाहनाच्या धडकेत बरे व ाईट होते कुटुंबावर किती मोठा दुःखाचा डोंगर कोसळतो हे किती भयानक वास्तव्य आहे, अशा गोष्टीला खरोखरच जबाबदार कोण आणि, अशा घटना घडून जे पळून जातात त्यांना शोधून कुठेतरी कठोर कारवाई करणे गरजेचे आहे जेणेकरून पुन्हा अशी बेशिस्त पणाने वाहने चालवणार नाहीत , अशीच घटना घडल्याने एका निष्पाप नागरिकाला आपला प्राण गमवा लागला आहे भिगवण ते भादलवाडी सर्व्हिस रोडवर,
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे . या प्रकरणी भिगवण पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनाच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , दि . ११ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास मौजे भादलवाडी ता . इंदापूर , जि . पुणे हद्दीत बिल्ट कंपनीच्या कॉलनी गेटजवळ , आयडीबीआय एटीएमसमोर भिगवण – भादलवाडी सर्व्हिस रोडवर हा अपघात घडला . या अपघातात अजित दगडु वाळके ( वय ५४ , रा . माऊली अपार्टमेंट , फ्लॅट क्र . ९ , भिगवण ) यांचा मृत्यू झाला . ते आपल्या होंडा स्प्लेंडर ( MH – ४५ – L – ५९ ८० ) या दुचाकीवरून भिगवणकडे जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली .
या धडकेत अजित वाळके यांना गंभीर दुखापत झाली . अपघातात त्यांचे पोट फाटून गंभीर जखम झाली तसेच हात – पायांना दुखापत झाली . या जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला . अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळी न थांबता वाहनासह फरार झाला .
या प्रकरणी अनिकेत अजित वाळके ( वय २३ ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिगवण पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे .
या गुन्ह्याची नोंद दि . १२ मार्च २०२६ रोजी पहाटे २.०४ वाजता करण्यात आली . या प्रकरणाचा पुढील तपास पोसई अमित पाटील हे करीत असून , प्रभारी अधिकारी मा . स . पो . नि . महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे .
दरम्यान , अपघात करणाऱ्या अज्ञात वाहनाचा शोध भिगवण पोलिसांकडून घेतला जात आहे . पोलीस प्रशासन कारवाई करतील शोध घेतील पण एका निरअपराध मनुष्याला विनाकारण आपला प्राण गमवावा लागला याचं काय? त्यांना न्याय कसा मिळणार, मात्र या घटने जो कोणी जबाबदार असेल त्यांना शोधून कठोरात कठोर कारवाई करणे गरजेचे आहे, जेणेकरून अशा प्रकारची घटना पुनश्च एकदा कुठल्याही चुकीने होणार नाही,

