विविधतेने नटलेल्या श्री संत तुकाराम महाराज पालखीची सणसर या ठिकाणी मुक्काम
भिगवण /प्रतिनिधी
साधू संत येता घरा तोची दिवाळी आणि दसरा या उक्तीप्रमाणे गेली दहा दिवस वारकरी पाई वारी करत विठ्ठलाच्या भेटीच्या आतुरतेने पंढरपुराकडे मार्गस्थ होत आहे आणि वाटेतील वाटसरू असो किवा गावकरी असो अगदी मनोभावी उत्तम प्रकारे वारक-यांची सेवा करीत आहेत. दि २७ जून रोजी पालखी संसर या गावी मुक्कामी वास्तविक पाहता विठ्ठल नामाच्या गजराने पूर्ण गाव गजबजलेल गावक-याच्या एका निर्णायची चर्चां मात्र सर्वत्र होती ,ती म्हणजे सायंकाळी आरती हि शाळेत १ते ३ नंबर ज्या विद्यार्थांनी संपादित केला आहे त्यांच्या हस्ते नकीच या गोष्टीमुळे समाजामध्ये चांगला संदेशजाऊन मुले शिक्षणामध्ये रस दावतील .
वारीत समाजप्रभोधन
ख-या अर्थाने शासन नेहमीच लोकांच्या हितासाठी कार्यरत आसते याची प्रचीती वारीमध्ये नक्कीच पाव्ह्यास मिळते कारण लोकांच्या रक्षणाची जबाबदारी साठी पोलीस बंधोबस्त असो ,किंवा तब्येतीसाठी डॉक्टर ,आथवा स्वछतेच प्रश्न असो शासन नेमीच या गोष्टींना प्राधान्य देऊन वारीमध्ये उत्तम प्रकारे सेवा देतात सर्वात महत्वाचे म्हणजे शासन जनतेसाठी पटनाट्या द्वारे समाजप्रबोधन कारीन्या करीता फिरते वाहन प्रत्येक विभागाचे ठेवले आहे .जेणेकरून शासन या द्वारे लोकामध्ये जनजागृती निर्माण करेल
तृतीय पंथीययांचा वारीत सहभाग
ख-या अर्थाने समाज तृतीय पंथीययांचा देव्ष करीत असून त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळाच आहे हे वास्तव कोणी नाकारू शकत नाही ,मात्र आपल्या तन मनाच्या भक्तिभावाने विठुरायाच्या दर्शनासाठी पायवारी करीत असून जेणेकरून समाज त्यांचाकडे चांगल्या दृष्टीकोनातून पाहीन.त्यांच्याशी वार्तालाब केला असता त्यांना वारी करिण्या चा उद्देश विचारला असता त्यांनी सांगितले कि वारीमध्ये आम्हला आई वडील संतांच्या रूपाने विठ्ठल रूपाने माय माऊली भेटले जीवन जगण्यासाठी संतांच्या सहवासाने जीवनाचे मर्म समजले त्याचप्रमाणे समाजाने आम्हाच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे जेणेकरून आम्ही समाजामध्ये ताठ मानेने जगू या साठी विठुरायाला साकडे लावणार असल्याचे सांगितले
