पुण्यात इंद्रायणी नदीवरील पूल वाहून गेल्याने मोठी जीवित हानी झाल्याची भीती
पुणे / प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून गेल्यामुळे. भयानक परिस्थिती उद्भवली असून काही जण वाहून गेल्यान त्याचा युद्धपातळीवर शोध
घेतला जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफला पाचरण करण्यात आले
आहे. रविवार असल्याने
पर्यटकांची संख्या जास्त होती, त्यामुळे हानी मोठ्या प्रमाणावर झाली
आहे. काही मोटारसायकलीसुद्धा नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची
माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूल कोसळल्यानंतर
तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. स्थानिक प्रशासन, अग्निशमन
दल आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दल ( NDRF) यांच्या पथकांनी…
घटनास्थळी धाव घेतली. सध्या बचावकार्य जोरात सुरू असून,
अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, ‘या घटनेत
प्राथमिक माहितीनुसार 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण
श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी
आहोत,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांनी पुढे सांगितले की, ‘6
जणांना आतापर्यंत वाचविण्यात यश आले आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट
मोडवर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 32 लोक जखमी झाले असून
त्यापैकी 6 गंभीर आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
करण्यात आले आहे. ‘
सीएम फडणवीस पुढे म्हणाले, ‘स्वतः विभागीय आयुक्त घटनास्थळाकडे
रवाना झाले आहेत. या घटनेसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी,
पोलिस अधीक्षक आणि संबधित तहसीलदार यांच्याशी मी सातत्याने
संपर्कात आहे. काही जण वाहून गेल्याने त्यांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. हे जरी खरं असलं तरी झालेली दुर्घटना फार मोठी गंभीर असून निष्पाप भाविकांना खूप मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले या गोष्टीला नक्कीच जबाबदार कोण असा संभ्रह सर्वसामान्यांना पडलेला असून इथून पुढे तरी अशा गंभीर घटना घडणार नाही याची प्रशासनाने नक्कीच दक्षता घेणे गरजेचे आहे असे सर्वसामान्य नागरिकाकडून बोलले जात आहे
